Video: भंगार दुकानाला आग, दुकाने जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

कोरोना आजाराच्या प्रादूर्भावामुळे संबंध महाराष्ट्र लॉकडाऊन झालेले आहे. चिखली शहरातदेखील ता.13 ते 16 या तीन दिवसाकरिता संपूर्ण लॉकडाऊन झालेले असतांनाच आज दुपारी शहरातील मध्यवर्ती ठिक़ाणी असलेल्या आठवडी बाजार, मच्छी बाजार परिसरातील भंगाराच्या दुकानांमध्ये दुपारी अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये भंगारचे दुकाने जळून खाक झाली आहेत

 

चिखली (जि.बुलडाणा) : कोरोना आजाराच्या प्रादूर्भावामुळे संबंध महाराष्ट्र लॉकडाऊन झालेले आहे. चिखली शहरातदेखील ता.13 ते 16 या तीन दिवसाकरिता संपूर्ण लॉकडाऊन झालेले असतांनाच आज दुपारी शहरातील मध्यवर्ती ठिक़ाणी असलेल्या आठवडी बाजार, मच्छी बाजार परिसरातील भंगाराच्या दुकानांमध्ये दुपारी अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये भंगारचे दुकाने जळून खाक झाली आहेत

याबाबत सविस्तर असे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून चिखली शहरात मुख्याधिकारी यांचे आदेशानुसार मेडिकल व दवाखाने वगळून संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने तीन दिवस संपुर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार आज ता.14 पासून संपूर्ण दुकाने बंद होती मात्र दुपारी 1 वाजेच्या सुमारास शहरातील आठवडी बाजारातील काही भंगाराच्या दुकानांना अचानक आग लागल्याची घटना घडली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले, आगीचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या मार्गाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.

 

 

नगर पालिकेची अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले. वृत्त लिहेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते, तर प्राथमिक माहितीनुसार येथील शे.समदखॉ यांची भंगार दुकान व नजीर कुरेशी यांचे भंगाराचे गोडाऊन असल्याचे माहिती समोर आली आहे. मुख्याधिकारी अभिजीत वायकोस व कर्मचारी तसेच पोलिस प्रशासन यांनी तत्परतेने काम केले.

सोशल डिस्टन्ससिंगचा फज्जा
शहरात आग लागल्याचे वृत्त कळताच येथील परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी याठिकाणी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. संपूर्ण शहर लॉकडाऊन असूनदेखील या परिसरातील संबंधीत दुकानदारांसह नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोना आजाराचे गांभीर्य मात्र पाळतांना नागरिक याठिकाणी दिसून आले नाही हे विशेष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: buldana news fire at chikhali market