लॉकडाऊनमुळे अडकले, तर हा आहे घरी जाण्यासाठी सोपा मार्ग

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 1 May 2020

तुम्ही विद्यार्थी असा की कामगार किंवा पर्यटक. लॉकडाऊनमुळे बाहेर अडकून पडले असाल तर या माध्यमातून अडचण दूर होऊ शकते.

 

बुलडाणा : राज्यातील अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, नागपूर, मुंबई, पुणे अशा विविध भागात बुलडाणा जिल्ह्यातील कामगार, रहिवासी, मजूर तसेच विद्यार्थी अडकलेले आहे. शासनाने अडकलेल्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी आता परवानगी देणे सुरू केले असून, याबाबत सुरक्षितता आणि काळजी सोबत घातलेल्या नियमांची पूर्तता केल्यानंतरच परवानगी देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बुलडाणा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने गुगल फॉर्म डेव्हलप केला असून त्यावर ऑनलाइन स्वरुपात अर्ज करता येणार आहे.

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना घरी तसेच जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात किंवा परराज्यात जाण्यासाठी गुगलवर एक फॉर्म डेव्हलप केला आहे. यामाध्यमातून प्रशासन ज्यांना जायचे किंवा यायचे आहे त्यावर विचार करून कळविणार आहे. याबाबत प्रशासनाने मार्गदर्शन सूचना जारी केली असून त्यामध्ये लॉकडाऊन काळात राज्यात अडकून पडलेले परराज्यातील मजूर, रहिवासी, विद्यार्थी, पर्यटक यांच्या स्थलांतरासाठी राज्य सरकारने कार्यवाही केली आहे. 29 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये केंद्र सरकारच्या गृह विभागाने विद्यार्थी, कामगार, मजूर, यात्रेकरू आणि इतर व्यक्ती यांना आपल्या आपल्या राज्यात घरी जाण्यासाठी राज्य  सरकारला दिशा निर्देश दिले आहे. 

 राज्य सरकारने 30 एप्रिलला एक आदेश काढून राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ नितीन करीर आणि त्यांचे दोन सहकारी यांनी अशा स्थलांतरला समन्वयक म्हणून नेमले आहे. त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. 

बुलडाणा जिल्ह्यातील राज्याबाहेर आणि राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांनी स्थानिक जिल्ह्याधिकारी किंवा तहसीलदार यांचेकडे सविस्तरपणे अर्ज ई-मेल द्वारे करण्यात यावा. ज्यांना ई-मेल करणे शक्य नसेल त्यांनी लेखी अर्ज तहसीलदार यांना द्यावा याबाबत शासन निर्णय घेणार असून त्याकरिता आपला अर्ज शासनाकडे पोहोचणे आवश्यक आहे. सोबतच खालील 4 लिंक वर सुद्धा आपण अर्ज करू शकता. 

बुलडाणा जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या व बुलडाणा जिल्हयामध्ये येणाऱ्या विस्थापीत कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://forms.gle/Hpo8xTbU1jtYygZD9 या लिंक वर माहिती भरावी लागणार आहे.
ही माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. अधिक माहीतीकरीता 07262242683 संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

असा करा संपर्क
बुलडाणा जिल्ह्यातील विविध  ठिकाणी अडकलेल्या नागरिकांनी आपली माहिती जिल्हाधिकारी यांचेकडील https://forms.gle/Hpo8xTbU1jtYygZD9   लिंक वर द्यावी

(1) राज्याबाहेरून येणाऱ्यासाठी 
http://mahapolice.gov.in/files/Headline/40.pdf

(2) राज्यात प्रवास करण्यासाठी
http://covid19epass.mahapolice.gov.in

(3) मुंबई वरून राज्यात इतर ठिकाणी जाण्यासाठी - 
https://mumbaipolice.gov.in/ApplicationforEmergencyTravel

4) पुणे येथून राज्यात इतर ठिकाणी जाण्यासाठी
Covid19.mhpolice.in

या चार लिंकवर करता येईल. याबाबत काही अडचण असल्यास खालील नंबर संपर्क करावा जेणेकरून आपली मदत करता येईल. आपल्या येण्या जाण्याचा निर्णय हा शासन स्तरावरच होणार आहे त्यामुळे आपण शक्य तितक्या लवकर वरील प्रमाणे अर्ज करावा आणि याबाबत काही अडचण असल्यास राज्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२३०३९ हे असून controlroom@maharashtra.gov.in हा ईमेल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buldana solve the the problem of lockdown, provide helpline for students, worker and tourist