बुलडाणा जिल्ह्यात धोका वाढला, आणखी दोन नमूने पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

कोरोना प्रादुर्भाव हा शांत आणि निसर्गरम्य बुलडाणा शहरासह आता जिल्ह्यात पाय पसरत असून, दिवसाला याच्या संसर्गाची साखळी अधिकच जटिल होत आहे. तीन दिवसाच्या फरकानंतर काल (ता.5) अचानक चार रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. तर, आज (ता.5) दिवसभर एकही व्यक्तीचा रिपोर्ट न आल्यामुळे दिलासादायक वाटले असले तरी, रात्री 11 वाजेदरम्यान दोन व्यक्ती बाधित असल्याचे अहवाल आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले आहे.

 

बुलडाणा  : कोरोना प्रादुर्भाव हा शांत आणि निसर्गरम्य बुलडाणा शहरासह आता जिल्ह्यात पाय पसरत असून, दिवसाला याच्या संसर्गाची साखळी अधिकच जटिल होत आहे. तीन दिवसाच्या फरकानंतर काल (ता.5) अचानक चार रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. तर, आज (ता.5) दिवसभर एकही व्यक्तीचा रिपोर्ट न आल्यामुळे दिलासादायक वाटले असले तरी, रात्री 11 वाजेदरम्यान दोन व्यक्ती बाधित असल्याचे अहवाल आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले आहे.

वर्‍हाडात 29 मार्चला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सातत्याने ही साखळी सुरुच असून, कालपर्यंत 9 वर बाधिताची संख्या आज (ता.6) दोनने वाढत 11 वर पोहचली आहे. बुलडाणा शहरापूरता मर्यादीत असलेला कोरोना हा 5 एप्रिलला जिल्ह्यातील इतर भागात पसरल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्ली मरकज येथून आलेल्या खामगाव तालुक्यातील चितोडा, चिखली शहरातील दोघे तर देऊळगावराजा शहरातील एकाचा समावेश होता. यानंतर जिल्हा प्रशासन सक्रिय होऊन चारही व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क गटात 27 व्यक्तीचे नमूने नागपूर येथील विषाणू तपासणी प्रयोग शाळेला पाठविले. तर, लो रिस्क गटाअंतर्गत 38 व्यक्तींचे स्वॅब नमूने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहे.

63 व्यक्तींना विलगीकरणकक्षात दाखल करण्यात आले होते. आज 34 व्यक्तींच्या नमून्यांपैकी 3 व्यक्तींचे नमूने हे निगेटीव्ह आल्याची माहिती संध्याकाळी डॉ. पंडित यांनी दिली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यापैकी 31 नमून्यांचे अहवाल येते प्रतीक्षेत होते परंतु, केवळ दोघांचे अहवाल येऊन ते पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे.

सदर व्यक्ती कुठली आहे याबाबत अधिकृतरीत्या कळले नसले तरी, दिल्ली कनेक्शन असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ययातील 25 व्यक्तींचे नमुने हे निगेटिव्ह आले आहे हे विशेष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: buldana two more patients positive