esakal | ...या गावाने टाळली बॅंकेत होणारी गर्दी, कोरोनाच्या लढ्यात गावाचे नाव पोहचले दिल्लीपर्यंत
sakal

बोलून बातमी शोधा

buldana sangrampur village provide banking sarvises for citizens

नागरिकांना केंद्र सरकार कडून येणारे उज्वला गॅसची रक्कम, पीएम किसान निधी, महिलांना जनधन खात्यातील पाचशे रुपये, त्याच बरोबर वृद्ध, अपंग यांचा पगार  ही सर्व कामे कोरोना संक्रमणाच्या काळात गावातच झाल्याने खूप सोयीचे झाले.

...या गावाने टाळली बॅंकेत होणारी गर्दी, कोरोनाच्या लढ्यात गावाचे नाव पोहचले दिल्लीपर्यंत

sakal_logo
By
पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : संग्रामपूर तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायतीकडून कोरोनाच्या लढ्यात सेवा देण्यात लढवलेली शक्कलीमुळे या गावाचे नाव दिल्ली दरबारी पोहचले आहे. बोडखा ग्रामपंचायत लोकसंख्येने लहान व विकासाचे बाबतीतही कमकुवत आहे. तसेच या ठिकाणी आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे स्त्रोत ही नाहीत. नवीन तंत्रज्ञान प्रगत होत असताना या ठिकाणी अनेक सुविधांचा अभाव आहे. असे असले तरी कोरोनाच्या लढ्यात गावातच ग्रामपंचायतच्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून राबविलेला उपक्रम दिल्लीपर्यंत पोहचला आहे.

येथील संगणक परिचालक प्रविण कंडारकर यांनी चालू महिन्यात ग्रामपंचायतीमधून स्टेट बँक ऑफ इंडिया व डीजीपेच्या माध्यमातून आता प्रयन्त 11 लाख रुपयेपर्यंतचे ट्रांजक्शन केले आहे. याचा खूप मोठा फायदा गावकऱ्यांना झाला. यामध्ये नागरिकांना केंद्र सरकार कडून येणारे उज्वला गॅसची रक्कम, पीएम किसान निधी, महिलांना जनधन खात्यातील पाचशे रुपये, त्याच बरोबर वृद्ध, अपंग यांचा पगार  ही सर्व कामे कोरोना संक्रमणाच्या काळात गावातच झाल्याने खूप सोयीचे झाले. या सोबतच गावातील प्रत्येकाचे बँकेचे काम गावातच झाले. त्यामुळे संग्रामपूर येथे बॅंकेमध्ये होणारी खूप मोठी गर्दी कमी झाली. गावातील व्यक्ती बाहेर जात नसल्याने कोरोना विषाणूचा फैलाव गावात टाळणे शक्य झाले. 


या कामामध्ये संगणक परिचालकास ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक यांचेसोबत स्टेट बँकेचे व्यवस्थापक सोनवणे यांचे सहकार्य मिळाले. या गावात कोरोनाचा धोका माहीत असताना गावातील दोन नागरिक तपासणीस नेण्यात आले तरीही सोशल डिस्टंसींगची योग्य सोय करून व प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. अशीच सुविधा तालुक्यात, जिल्यात प्रत्येक गाव खेड्यात दिली तर कोरोना संकट कमी करण्यासाठी खूप मोठी उपलब्धी ठरेल!

 या संदर्भात पंचायत समिती संग्रामपूरचे गट विकास अधिकारी चव्हाण यांनी उपक्रमाची माहिती राज्य शासनाला दिली. त्यानुसार सीएससी प्रकल्प महाराष्ट्र राज्य समन्वयक वैभव देशपांडे यांनी हा संदेश दिल्ली कार्यालयाला पाठविला असल्याची माहिती आहे.