जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रमाणपत्र देण्याचे निर्देश अपर परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या कार्यालयातून प्राप्त झाले आहेत. अत्यावश्यक सेवाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे. 

 

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रमाणपत्र देण्याचे निर्देश अपर परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या कार्यालयातून प्राप्त झाले आहेत. अत्यावश्यक सेवाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे. 

त्यामुळे विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागणीवरुन त्यांना जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक विना अडथळा करता यावी यासाठी प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वतंत्र संपर्क कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यात मोटार वाहन निरीक्षक खेडकर व मोटारवाहन निरीक्षक कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर संपर्क कक्ष सुटीच्या दिवशीही सुरु राहिल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.
बााजार समितीमध्ये शेती माल विकण्यासाठी आणणाऱ्यांना वाहतुकीचा अडथळा होऊ नये म्हणूनही अशा माल वाहनांना पास वितरित केल्या जाणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Certificate for transporting essential goods at Akola!