चिंता वाढली, पुन्हा एका पोलिस कर्मचाऱ्यांसह अकरा रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

  • अकोल्यात झपाट्याने वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता रुद्र रूप धारण करत आहे कारण सर्व सामान्य नागरिकांपासून आता हा कोरोना पोलीस विभागातही आगेकूच करत आहे. 

 

अकोला  : अकोल्यात झपाट्याने वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता रुद्र रूप धारण करत आहे कारण सर्व सामान्य नागरिकांपासून आता हा कोरोना पोलीस विभागातही आगेकूच करत आहे. 

गुरुवारी प्राप्त झालेल्या एकूण 74 अहवालांत पैकी 11 नवे रुग्ण पॉझिटिव्ह दाखल झाले आहेत यामध्ये रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कॉन्स्टेबल चा ही समावेश आहे.
गुरुवारी एकूण 74 अहवाल प्राप्त झाले त्यामध्ये 63 अहवाल निगेटिव्ह तर अकरा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी दोन खैर मोहम्मद प्लॉट, दोन माळीपूरा, तसेच फिरदोस कॉलनी,आंबेडकर नगर,गव्ह.गोडावून खदान, गोकुळ कॉलनी, तारफ़ैल,खडकी, पोलीस क्वार्टर येथील रहिवासी आहेत. त्यात नऊ पुरुष आणि दोन महिला आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आता सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१९७
  • मयत-१५(१४+१)
  • डिस्चार्ज-६०
  • दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२२

रामदासपेठ पोलीस ठाणे कोरोनाच्या रडारवर
रामदासपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या एका कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ते राहत असलेला परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे रामदासपेठ पोलिस ठाण्यात याआधीही एएसआय पदाच्या पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला होता त्यानंतर आज पुन्हा पोलीस ठाणे मधील कॉन्स्टेबल पॉझिटिव्ह आढळल्याने रामदासपेठ पोलिस ठाणे कोरोनाच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे.

सर्वच कर्मचाऱ्यांच्या टेस्टिंग सुरू
रामदास पेठ पोलिस ठाण्यातील पॉझिटिव्ह आढळलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतरही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे सोबतच आता इतरही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करणे अनिवार्य ठरणार आहे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Concerns grew in Akola, again adding eleven patients, including one police officer