पुन्हा सहा महिलांसह एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाचे हॉटस्पॉट बनलंय अकोला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

कोल्यात शनिवारी प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार सहा महिलांसह एक पुरुष पॉझिटिव आढळला आहे आताही रुग्णसंख्या 400 कडे आगेकूच करीत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी एकूण 37 अहवाल प्राप्त झाले यामध्ये सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अकोला : अकोल्यात शनिवारी प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार सहा महिलांसह एक पुरुष पॉझिटिव आढळला आहे आताही रुग्णसंख्या 400 कडे आगेकूच करीत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी एकूण 37 अहवाल प्राप्त झाले यामध्ये सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

शनिवारी पॉझिटिव्ह आलेले रुग्णांपैकी सहा महिला व एक पुरुष असून त्यात पाच जण फिरदोस कॉलनी येथील रहिवासी असून उर्वरित एक माणिक टॉकीज जवळ टिळकरोड तर अन्य लोहिया नगर खोलेश्वर येथील रहिवासी आहे.

पाच जणांना डिस्चार्ज
22 मे रोजी रात्री पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील दोघे खैर मोहम्मद प्लॉट येथील तर अन्य फिरदोस कॉलनी, आगर वेस व अकोट फ़ैल येथील रहिवासी आहेत. या पाचही जणांना घरी सोडण्यात आले आहे.

सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३६२
मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२११
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive, corona hotspot in Akola again with six women

Tags
टॉपिकस
Topic Tags: