पोलिस निघून जाताच पुन्हा रस्त्यावर तरुणांचे घोळके

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

अकोला शहारतील महम्‍मद अली रोड, टिळक रोड, गौरक्षण रोड, रिंग रोड कौलखेड, खदान, उमरी, जठारपेठ परिसरासह अनेक भागातील रस्त्यांवर अतिउस्हाही तरूण मला काय होते, आया अर्विभावात रस्त्यावर घोळके करून फिरताना दिसत आहे. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी दंडूक्यांचा प्रसाद दिला होता. यात कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्यांनाही पोलिसांचा मार खावा लागला.

अकोला : राज्यासह जिल्ह्यात संचारबंद लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एकावेळी रस्त्यावर घोळका करण्यास मनाई आहे. असे असतानाही अतिउत्साही तरूण रस्त्यावर उतरत असल्याने पोलिसांना त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी लागत आहे. कारवाई करून पोलिस निघून गेल्यानंतर या अतिउत्साही तरूणांचे घोळके पुन्हा रस्त्यावर दिसत असल्याने आता पोलिसही वैतागले आहेत.

अकोला शहारतील महम्‍मद अली रोड, टिळक रोड, गौरक्षण रोड, रिंग रोड कौलखेड, खदान, उमरी, जठारपेठ परिसरासह अनेक भागातील रस्त्यांवर अतिउस्हाही तरूण मला काय होते, आया अर्विभावात रस्त्यावर घोळके करून फिरताना दिसत आहे. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी दंडूक्यांचा प्रसाद दिला होता. यात कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्यांनाही पोलिसांचा मार खावा लागला. त्यामुळे पोलिसांना संयमाने वागण्याचे आदेश देण्यात आले. त्याचा गैरफायदा घेवून काही अतिउत्साही तरूण बुधवारी पुन्हा रस्त्यांवर दिसून आलेत. टिळक रोडसह काही भागात पोलिसांनी या अतिउत्साही तरूणांना खाकीचा प्रसाद दिला. मात्र पोलिस निघून गेल्यानंतर ही घोळकी पुन्हा रस्त्याने फिरताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन व शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच हरताळ फासली जात आहे.

हम नही सुधरेंगे
प्रशासनाकडून वारंवार गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यानंतरही नागरिक बाजारपेठा आणि किरणा दुकांनांमध्ये गर्दी करताना दिसत आहे. जीवनावश्यक वस्तू व सेवा संचारबंदीच्या काळातही नियमित सुरू राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची करताचा भासणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या माल वाहतुकीलाही सुट देण्यात आली आहे. त्यानंतरही नागरिक बाजारात व किरणा दुकानात गर्दी करून स्वतःसह इतरांचेची आरोग्य धोक्यात आणत आहे. वारंवार सूचना देवूनही हम नही सुधरेंगे, अशीच स्थिती अकोल्यात एकंदर बुधवारीही दिसून आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus: On the young road again when Akola police leave