करू निर्धार, उभारू आरोग्याची गुढी!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष...नवी सुरुवात करण्याचा दिवस... कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व देशापुढील महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी ‘कोरोना’ला पराभूत करण्याकरिता नागरिकांनी घराबाहेर पडून नये आणि इतरांनाही पडून न देता कुटुंबाचे व स्वतःच्या आरोग्याची गुढी हिंदू नववर्षाच्या निमित्ताने उभारण्याचा निर्धार करण्याचा हा दिवस आहे.
 

अकोला : गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष...नवी सुरुवात करण्याचा दिवस... कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व देशापुढील महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी ‘कोरोना’ला पराभूत करण्याकरिता नागरिकांनी घराबाहेर पडून नये आणि इतरांनाही पडून न देता कुटुंबाचे व स्वतःच्या आरोग्याची गुढी हिंदू नववर्षाच्या निमित्ताने उभारण्याचा निर्धार करण्याचा हा दिवस आहे.

गुढीपाडव्याला दरवर्षी मोठ्याप्रमाणावर विविधा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन विविध संघटनांकडून केले जाते. यावर्षीही अनेक दिवसांपासून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी संघटनांनी केली होती. अकोला शहरातूनच भव्य सांस्कृतीक रॅली काढण्याची तयारीही करण्यात आली होती. त्यापूर्वीच देशापुढे कोरोना विषाणूचे महासंकट उभे झाले. त्यामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली. गुढीपाडवा व नववर्षाचे स्वागत आत घरी बसून कुटुंबासोबत साजरा करीत आरोग्याची गुढी उभारून देशापुढील मोठ्या संकटाचा सामना करण्याचा निर्धार या निमित्ताने प्रत्येकाने करण्याची ही वेळ आहे.

प्रशासन तुमच्या सोबत, तुम्ही कुणासोबत?
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी उपाययोजना केल्या जात आहे. प्रसंगी तुमच्या आरोग्यासाठी प्रसासनाकडून सक्तीही केली जात आहे. प्रशासन प्रत्येक संकटात तुमच्यासोबत आहे. आता तुम्ही कुणासोबत? तुमच्या आरोग्यासोबत की हुल्लटबाजी करणाऱ्या समाजकंटकातील टोळक्यांसोबत हे तुम्हालाच ठरवायचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision to do it, raise the secret of health!