अखेर दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका येथे होणार जमा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभाग अमरावतीच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या उत्तर पत्रिका शिक्षण मंडळात जमा करण्याचे आदेश दिले होते;

अकोला :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभाग अमरावतीच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या उत्तर पत्रिका शिक्षण मंडळात जमा करण्याचे आदेश दिले होते; परंतु कोरोना संकटामुळे या उत्तरपत्रिका जिल्हास्तरावर संकलित करण्याची मागणी विज्युक्टाने लावून धरल्यानंतर शिक्षण मंडळाने पूर्वीचा आदेश रद्द करीत जिल्हास्तरावर या उत्तरपत्रिका संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील दहवीच्या उत्तरपत्रिका संकलनाचे काम जिल्हास्तरावरच येत्या काही दिवसात पूर्ण करण्याबाबत बोर्डाचे अध्यक्ष गोसावी यांनी आश्वस्त केले आहे. अकोला जिल्ह्यात दहावी व बारावी उत्तरपत्रिका संकलन संभाव्यता गुरुवार, २१ मे २०२० ला जवाहर नवोदय विद्यालय बाभुळगाव येथे करण्यात येणार आहे.

कोरोना संकटकाळात बोर्ड अधिकारी व कर्मचारी तथा आमचे सर्व नियामक यांच्या योग्य समन्वयातून हे कार्य निश्चितपणे योग्य पद्धतीने पूर्ण होईल, असा विश्‍वास विज्युक्टाचे अध्यक्ष तथा शिक्षण समन्वय समिती सचिव डॉ. अविनाश बोर्डे यांनी व्यक्त केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally akola buldana answer sheets of 10th and 12th will be deposited here