राज्यातील पंधराशे माजी आमदार मदतीसाठी सरसावले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरात केल्या जात असलेल्या उपाययोजनांकरिता राज्यातील पंधराशे आमदारांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन सहाय्यता निधी करता देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार समन्वय समितीचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे यांनी शुक्रवारी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन मानधन कपात करण्याची विनंती केली आहे

 

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरात केल्या जात असलेल्या उपाययोजनांकरिता राज्यातील पंधराशे आमदारांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन सहाय्यता निधी करता देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार समन्वय समितीचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे यांनी शुक्रवारी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन मानधन कपात करण्याची विनंती केली आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या २५ मार्चपासून देशभरात लॉकडाउन असल्यामुळे गोरगरिबांना अन्नधान्य पुरवणे, गरजूंना औषध पुरवणे, उपचारासाठी उपायोजना करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असणार आहे.

या पार्श्वभूमीवरच राज्यातील पंधराशे माजी आमदार मदतीसाठी पुढे सरसावले आहे. माजी आमदार समन्वय समितीने कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात आर्थिक मदतीचा हात पुढे करत त्यांच्या एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील विनंती करणारे पत्र समन्वय समितीचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांना शुक्रवारी दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former MLAs of Maharashtra help in corona Crisis