बापरे! गुजरातचे शंभरपेक्षा अधिक युवक बसने आले अन् नदीत...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विविध भागात रोजगार, शिक्षणासाठी गेलेले नागरिक आपल्या मुळ गावी परत येत आहेत.

कुरणखेड (जि.अकोला) : पुणे येथून गुजरातला जाणाऱ्या दोन बसमधील सुमारे 100 पेक्षा अधीक युवकांनी येथील बस थांब्यावर थांबा दिला. त्यानतंर त्यांच्यातील काही युवकांनी राष्ट्रीय महामार्ग 6 लगत असलेल्या काटेपूर्णा नदीत अंघोळ केल्याची धक्कादायक बाब रविवारी (ता.3) पुढे आली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून आले. तर या प्रकरणाची स्थानिक कोरोना जनजागृती समितीने गंभीर दखल घेत या संपूर्ण परिसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विविध भागात रोजगार, शिक्षणासाठी गेलेले नागरिक आपल्या मुळ गावी परत येत आहेत. त्यामध्ये पुण्यावरून काही युवक सुरत (गुजरात) येथे जी.जे.03 ए.डब्लू. 9931 व जी. जे. 36 टी.0157 या क्रमांकाच्या दोन ट्रॅव्हल्सने जाण्यास निघाले होते. रविवारी (ता.3) सदर दोन्ही ट्रॅव्हल्स या कुरणखेड येथे पोहोचल्या. दोन्ही ट्रॅव्हल्समध्ये सुमारे 100 पेक्षा अधीक युवक असल्याची माहिती आहे. यातील काही युवकांनी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या काटेपूर्णा नदीत अंघोळ केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. 

आवश्यक वाचा - Lockdown : अॅड.प्रकाश आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी केली ही महत्त्वाची मागणी

पुण्यासारख्या कोरोना संसर्ग असलेल्या भागातून त्यांनी प्रवास केल्याने त्यांना संसर्ग तर नाही ना अशी परिसरात चर्चा निर्माण झाल्याने नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने कुरणखेडचे उपसरपंच सुशिल मोहोड, राजकुमार जामणिक, शेख नाजेर, तंटामुक्ती व आरोग्य समितीचे सदस्य डॉ. रणजीत अप्तुरकर, ग्रा.पं. कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.4) काटेपुर्णा नदिकाठी, बस थांब्याचा परिसर, राष्ट्रीय महामार्ग परिसर व इतर ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच काटेपुर्णा नदिकाठी पुलाजवळ आंघोळी करीता कुणीही जावू नये असे आवाहन पोलिस पाटील प्रज्ञाताई राजकुमार जामणीक यांनी केले आहे.

हेही वाचा - धक्कादायक! देशी-विदेशी बंद असल्याने लोकांचा गावठी दारूवर होता जोर अन् दारू विक्रेत्यालाच झाला कोरोना

संपूर्ण परिसरात जंतूनाशक फवारणी
दोन ट्रॅव्हल्समध्ये ते युवक होते. यातील पाच-सहा युवकांनी नदीत आंघोळ केल्याची माहिती आहे. यासंदर्भात पोलिस स्टेशनला कळविण्यात आले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून संपूर्ण परिसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे.
-सुशिल मोहोड, उपसरपंच, कुरणखेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat youth bathing in Katepurna river