esakal | अरे वाह! या कृषी उत्पन्न बाजार समितीने कर्मचाऱ्यांना दिली ही आवश्‍यक सुविधा; कोरोनाच्या काळात होणार फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

apmc shegaon.jpg

बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणू (कोविड-19) ने धुमाकूळ घातलेला आहे.

अरे वाह! या कृषी उत्पन्न बाजार समितीने कर्मचाऱ्यांना दिली ही आवश्‍यक सुविधा; कोरोनाच्या काळात होणार फायदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेगाव (जि.बुलडाणा) : सध्यस्थितीत राज्यामध्ये कोरोनाचा धोका पाहता शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने कार्यरत 17 कायम व रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 लाखाचा विम्याचे कवच देण्याचा निर्णय 12 मे रोजी समितीचे उपसभापती सुनील वानखडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते घेण्यात आला आहे. या सभेला समितीचे ज्येष्ठ संचालक तथा सहकारनेते पांडुरंगदादा पाटील यांचे सह 17 संचालकांची उपस्थिती होती.

बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणू (कोविड-19) ने धुमाकूळ घातलेला आहे. तसेच लोकडाऊन यशस्वी करणेसाठी व कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिस विभागातील कर्मचारी व त्या अनुषंगाने इतर विभागातील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत आहेत. अशा कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाने प्रत्येक कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा विमा, वेतनवाढ व इतर देय असलेल्या लाभाची घोषणा केलेली आहे.

महत्त्वाची बातमी - अजितदादांच्या वरदहस्ताने तोंडदाबून बुक्यांचा मार; या जिल्ह्यात राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस

महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातही लॉकडाउन यशस्वी करण्यासाठी व कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिस विभागातील कर्मचारी, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी व त्या अनुषंगाने इतर विभागातील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत आहेत अशा कर्मचारी साठी प्रोत्साहन पर भत्ता, प्रत्येक कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा विमा, वेतनवाढ व इतर देय असलेल्या लाभाची घोषणा नुकतीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे. 

हेही वाचा - विदारक : दिवसा रस्त्यावर तर रात्री ही लढाई; ‘कोरोना फायटर्स’चे छतही...

तसेच शासनाचे आदेशानुसार महाराष्ट्रातील जनतेसाठी व शेतकऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत करणेसाठी बाजार समितीचे कर्मचारी आपली जीवाची पर्वा न करता बाजार समिती सुरू ठेऊन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, भाजीपाला, कांदा, भुसार लिलावाचे कामकाज करीत आहेत. या परिस्तिथीत बाजार समितीचे कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका नाकारता येत नाही. तसेच बाजार समितीचे कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.

त्यामुळे अशा परिस्थितीत काही अघटित घडल्यास त्यांचे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजार समितीमध्ये सध्या धान्य व कापूस या शेतमालाची खरेदी सुरू आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दरदिवशी अनेक शेतकऱ्यांसोबत संपर्क करावा लागतो. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता कर्मचाऱ्यांना सुरक्षा म्हणून कुटुंबाच्या भविष्याचा विचार करता प्रत्येक कर्मचाऱ्यांचा 10 लाखाचा विमा उतरविला आहे.
 
या कर्मचाऱ्यांचा आहे समावेश
या विम्यामध्ये समितीचे सचिव विलास पुंडकर, लेखापाल विनोद पुंडकर, निरीक्षक अनंत शेंगोकार, कोषापाल सुनीता खोंड, वरिष्ठ लिपिक उमेश कुलकर्णी, लिपिक नागोराव दाभेराव यांचे सह हरिदास चोपडे, प्रशांत घोडेराव, भगवान घाटे, दीपक कडाळे, विष्णू निळे, संगणक चालक नितीन तायडे, मंडी अनलिस्ट रितेश मेटांगे, रात्रपहारेकरी प्रमोद पहुरकर, शिपाई शैलेंद्र वाकोडे, वाहन चालक योगेश सांभारे, सफाई कामगार संतोष ढढोरे यांचा समावेश आहे.

विमा काढणारी पहिलीच बाजार समिती
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचाऱ्याचा विमा काढणारी शेगाव बाजार समिती ही विदर्भात एकमेव असावी, असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर व बाजार समितीचे संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.