हा जिल्हा महाराष्ट्रात नाही का? भाजपचा राज्य सरकारला प्रश्न; पवार, ठाकरे यांच्या मदतारसंघात होऊ शकते, ते येथे का नाही?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात विशेष आरोग्य सेवा उपलब्ध करून देवू शकते. पण कोरोना विषाणू संसर्गाचे हॉटस्पॉट ठरत असलेला अकोला जिल्हा हा महाराष्ट्रात नाही का, असा प्रश्‍न भाजपतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

अकोला : राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात विशेष आरोग्य सेवा उपलब्ध करून देवू शकते. पण कोरोना विषाणू संसर्गाचे हॉटस्पॉट ठरत असलेला अकोला जिल्हा हा महाराष्ट्रात नाही का, असा प्रश्‍न भाजपतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

कोरोना विषाणू कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून राजकीय हेतूने अकोल्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. इतर जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा प्रमुख मंत्र्यांच्या मतदारसंघात उपलब्ध होऊ शकते. तीच रुग्ण संख्या मोठ्याप्रमाणावर वाढत असलेल्या अकोल्यात का नाही, असा प्रश्‍न अकोला जिल्हा भाजपतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणांसोबत पोलिस विभाग यांच्यात आपसात समन्वय नसल्याने अकोल्यात अनेक अचडचणी येत आहे. ठाणे, डोंबिवली, वरळी, बारामतीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करून विषाणू संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. अकोल्यात या संदर्भात मागणी करूनही दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही भाजपतर्फे करण्यात आला.

...तर आंदोलनाचा इशारा
अकोला महानगरपालिकेतर्फे केल्या जात असताना राज्य शासनाच्या अंगीकृत असलेली आरोग्य यंत्रणेचे सहकार्य मिळत नाही. या संदर्भात राज्य शासनाने योग्य तो निर्णय घेवून येथे यंत्रणांमधील समन्वयासाठी ठोस उपाययोजना न केल्यास लोकशाही पद्धतीने राज्य सरकारच्या विरोधात शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या वतीने प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Isn't akola district in Maharashtra? BJP questions state government; Pawar, Thackeray's support can happen, why not here?