COVID19 : एक रुग्ण रिकव्हर होण्यासाठी लागतो ऐवढा खर्च; कितीला पडते एक कोरोना टेस्ट?...वाचा

भगवान वानखेडे
Sunday, 24 May 2020

कोरोनाविरुद्ध शासकीय कर्मचारी असो अथवा शासकीय रुग्णालये, सर्व जण कोरोना लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिवस-रात्र एकत्रितपणे लढा देत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, कोविड सेंटर कोरोना रुग्ण आणि संशयितांनी भरलेले आहेत.

अकोला : एक कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत सुमारे किमान पंचवीस ते तीस हजार रुपयांपर्यंत खर्च लागत असून, केवळ एका टेस्टसाठी साडेचार हजार रुपयांचा खर्च येत आहे. आढळत असलेल्या रुग्णांच्या संख्येनुसार एका कोविड बाधित रुग्णांला बरे करण्यासाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च लागत असल्याने शासकीय यंत्रणेवरील कामाच्या ताणाबरोबरच आर्थिक फटका मोठ्या संख्येने बसत असल्याची माहिती आहे.

एका पॉझिटिव्ह रुग्णामागे रोज 5 हजार रुपयांप्रमाणे जवळपास 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च होत आहे. रुग्णांची प्रकृती गंभीर असेल, तर यापेक्षा अधिक खर्च होतो. शहरातील रुग्णसंख्येचा विचार करता आतापर्यंत रुग्णांच्या उपचारावर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या निदानापासून ते उपचार होऊन कोरोनामुक्त होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. 

हेही वाचा - अरेरे! मोफत मिळतोय तांदुळ तरी होतोय गैरप्रकार; त्या तांदुळाच्या बदल्यात...

कोरोनाविरुद्ध शासकीय कर्मचारी असो अथवा शासकीय रुग्णालये, सर्व जण कोरोना लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिवस-रात्र एकत्रितपणे लढा देत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, कोविड सेंटर कोरोना रुग्ण आणि संशयितांनी भरलेले आहेत. रुग्ण आढळून येण्यापूर्वी कोरोनाच्या उपचारासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली. त्यानंतर आता रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

आवश्यक वाचा - थरारक! या कारणामुळे त्याने तीनशे मीटर मृतदेह नेला फरफटत आणि...

पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून तो बरा होऊन घरी जाईपर्यंत अनेक गोष्टींसाठी खर्च केला जात आहे. एका रुग्णावर रोज किमान चार ते पाच हजार रुपयांचा खर्च होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर पूर्वी 14 दिवस उपचार केले जात होते. आता हा कालावधी 10 दिवसांवर आला आहे. त्यामुळे गंभीर नसलेल्या रुग्णासाठी जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च येत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

क्षमतेपेक्षा अधिक केल्या जात आहेत टेस्टींग
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यात उभारण्यात आलेल् कोरोना विषाणू चाचणी लॅबची दिवसाला 200 स्वॅब तपासणीची क्षमता आहे. मात्र, मागील चार ते पाच दिवसापासून 300 ते 325 स्वॅब तपासले जात आहेत. मागील चार दिवसांत 1200 ते 1300 स्वॅब तपासण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

तीन सिफ्ट केली जाते स्वॅब तपासणी
अकोल्यात उभारण्यात आलेल्या कोरोना विषाणू चाचणी लॅबला पूर्णत्वास जाण्यासाठी आणि त्यामध्ये आवश्यक ते उपकरणे उभारणीसाठी दोन ते अडीच कोटी रुपये खर्च आला असून, अकोल्यात वाढती रुग्णसंख्या पाहता या कोरोना विषाणू चाचणी लॅबमध्ये तीन सिफ्टमध्ये स्वॅब तपासणी केली जात असल्याची माहिती दे्ण्यात आली आहे.

असा आला आतापर्यंत खर्च
एका रुग्णांची टेस्टिंगसाठी चार हजार 500 रुपये खर्च लागतो. आतापर्यंत अकोल्यात 3 हजार 355 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. यासाठी आतापढार्यंत 1 कोटी 50 लाख 97 हजार 500 रुपये ऐवढा खर्च झाला आहे. तर रुग्ण पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या अकोल्यात 206 ऐवढी असून, एका रुग्णामागे 30 हजार रुपये ऐवढा खर्च पकडल्यास आतापर्यंत 61 लाख 80 हजार रुपये खर्च झाला असून, हा सर्व सरकारकडून केल्या जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It costs 25 to 30 thousand rupees for a corona patient to recover in akola