कोरोनाग्रस्तांसाठी 40 बेडचं स्वतंत्र 'आयसोलेशन कक्ष!'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी  प्रशासनाने  विविध  उपायोजना हाती घेतले आहेत. रुग्णांची  संख्या  वाढली तर  त्यांच्यावर उपचारासाठी आवश्यक यंत्रणा  तयार करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून खामगावमध्ये कोरोनाग्रस्तावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र आयसोलेशन कक्ष सुरू करण्यात आले असून आज जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आयसोलेशन वार्डची पाहणी केली.

 

खामगाव (जि.बुलडाणा) : कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी  प्रशासनाने  विविध  उपायोजना हाती घेतले आहेत. रुग्णांची  संख्या  वाढली तर  त्यांच्यावर उपचारासाठी आवश्यक यंत्रणा  तयार करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून खामगावमध्ये कोरोनाग्रस्तावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र आयसोलेशन कक्ष सुरू करण्यात आले असून आज जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आयसोलेशन वार्डची पाहणी केली.

कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत १२ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची लक्षण असलेल्या तसेच संशयीत रुग्णांसाठी बुलडाणा येथील महिला रुग्णालयात १०० बेडचं सर्व सुविधायुक्त रुग्णालय तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली होती, त्यांनंतर आता खामगाव सामान्य रुग्णालयात एका स्वतंत्र इमारतीत कोरोना ग्रस्तांसाठी ४० बेडचं आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. हा विभाग पुर्णतः स्वतंत्र राहणार असून प्रवेशद्वार सुध्दा वेगळे राहील. आवश्यक सर्व सुविधा याठिकाणी राहणार आहेत. कोरोना रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे. आज जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज या विभागाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार शितल रसाळ, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुनील थोटांगे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते

मॅडम म्हणाल्या 'बेस्ट ऑफ लक'
खामगाव सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षास जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी भेट दिली. यावेळी सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात आवश्यक असलेल्या सोयी सुविधा बाबत चर्चा केली. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना आवश्यक साहित्य व इतर माहिती दिली. हे साहित्य तातडीने पुरविण्याबाबतजिल्हाधिकार्‍यांनी संबंधितांना निर्देश देऊन आरोग्य विभागाच्या टीमला 'बेस्ट ऑफ लक' म्हणत कोरोनाशी दोन हात करण्याबाबत प्रेरणा दिली.

खामगाव सामान्य रुग्णालयात ४० बेड असलेला स्वतंत्र आयसोलेशन कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. या कक्षात आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा  आहेत.जिल्हाधिकारी सुमन चंद्रा मॅडम यांनी या कक्षाची पाहणी करून योग्य ते निर्देश दिले. खामगाव येथे सध्या ३ व्हेंटिलेटर उपलब्ध असून आणखी सात व्हेंटिलेटर व आवश्यक साहित्याची पुर्तता करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khamgaon 40 Bed Individual 'Isolation Room!'