भाजीपाला हर्रासी बंद, शेतकऱ्यांना फटका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून गर्दी होत असल्याने खामगाव येथील भाजीपाला हर्रासी बंद करण्याचा  निर्णय मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी घेतला, हा निर्णय घेत घेतांना कोणतीही पर्यायी व्यवस्था केली गेली नाही, त्याचा फटका शेतकऱ्यांसोबतच ग्राहकांना बसल्याचे चित्र आज ( ता.१३) दिसून आले.

 

खामगाव (जि.बुलडाणा) : कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून गर्दी होत असल्याने खामगाव येथील भाजीपाला हर्रासी बंद करण्याचा  निर्णय मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी घेतला, हा निर्णय घेत घेतांना कोणतीही पर्यायी व्यवस्था केली गेली नाही, त्याचा फटका शेतकऱ्यांसोबतच ग्राहकांना बसल्याचे चित्र आज ( ता.१३) दिसून आले.

खामगाव येथील अडत बाजारात तालुका व जिल्ह्यातील बहुतांश भागातील  शेतकरी भाजीपाला विक्रीस आणतात मात्र येथे नियोजन नसल्याने गर्दी होत होती. त्यामुळे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी रविवारी पहाटे डत बाजारात पाहणी केली आणि सोशल सोशल डिस्टसिंग पाळल्या जात नसल्याने अडत बाजारातील हर्रासी बंद करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आज खामगावात भाजीपाल्याची होऊ शकली नाही, त्याचा भाजीपाला बेल्टला मोठा फटका बसत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. भाजीपाला उत्पादकांचे हाल न पहावणारे आहेत भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असणारी गावे अडचणीत आले आहेत. रोग, दर, मागणी याचे गणित घालून कुठेतरी चार पैसे गाठीला बांधण्याचे स्वप्न पहाणारा भाजीपाला उत्पादक जगवायचा असेल तर शेतमाल भाजीपाला विक्रीची पर्यायी व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अडत बंद असल्याने आता भाजी शेतकरी अडचणीत आला असून त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. बाजारपेठ नसल्याने शेतमाल विकायचा कुठे ?हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे तर ग्राहकांना सुद्धा फटका बसत आहे

खामगाव येथील अडत बाजारात भाजीपाला  हर्रासी दरम्यान मोठी गर्दी केली जात होती. कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे परंतु वारंवार सूचना दिल्यावर सुद्धा पालन होत नसल्याने भाजीपाला हर्रासी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी खामगाव

 कठीण परिस्थितीत  जीव धोक्यात घालून शेतकरी जनतेला अन्न व भाजीपाला पुरवण्याचं काम करत आहे. खामगाव येथील नगर पालिका प्रशासनाने भाजीपाला हर्रासीवर बंदी आणली मात्र पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. ती त्वरित करावी. शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीसाठी अडवणूक करण्यात येवू नये.
- कैलाश फाटे, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना बुलढाणा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khamgaon vegetable market closed, loss of farmers