आता हा जिल्हाही ऑरेंज झोनमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

जिल्ह्यामधे एकमेव असलेल्या कोरोनाबाधीत रूग्णाचे दोन अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा असताना आज ता. 17 या रुग्णांचा तिसरा अहवाल पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला आहे. 

 

वाशीम: जिल्ह्यामधे एकमेव असलेल्या कोरोनाबाधीत रूग्णाचे दोन अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा असताना आज ता. 17 या रुग्णांचा तिसरा अहवाल पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला आहे. 

मेडशी येथील एका इसमाला कोरोनाची बाधा झाली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून त्याच्यावर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयच्या विषेश कक्षात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आठ दिवसापूर्वी त्याच्या घशातील लाळेचे नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले होते. तेव्हा ते नमुने निगेटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा चार दिवसापूर्वी लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते.तेही निगेटिव्ह आले. चोवीस तासानंतर पुन्हा त्याच्या लाळेचे नमुने घेतले होते मात्र तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे नमुने पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

या रुग्णाला आता पुन्हा आठ दिवस उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यानंतर पुन्हा त्याच्या लाळेचे नमुने घेतले जाणार आहेत. वाशीम जिल्ह्यामध्ये सध्या हा एकमेव रूग्ण आहे. तिसर्या तपासणीचे नमुने जर निगेटिव्ह आले असते तर या रूग्णाला सुट्टी देण्यात येणार होती. मात्र हा रूग्ण पॉझिटिव्ह असल्याने जिल्हा पुन्हा  ऑरेंज झोनमध्ये गेला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now wasim is on orange zone

टॉपिकस