COVID19 : या जिल्ह्यात पाॅझिटिव्ह अहवालांची संख्या पोहोचली 387 वर; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी एकूण 169 अहवाल प्राप्त झाले.

अकोला : अकोल्यात रविवारी प्राप्त झालेल्या एकूण 169 अहवाल पैकी नऊ जण पुन्हा पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता अकोला येथे पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या 387 वर जाऊन पोहोचली आहे. तर अकोल्यात पुन्हा एका जणांचा मृत्यू झाला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी एकूण 169 अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये नऊ अहवाल हे पॉझिटिव्ह आले असून यामध्ये चार महिला तर पाच पुरुषांचा समावेश आहे विशेष म्हणजे पाच जर हे तेल्हारा तालुक्यातील असल्याने आता तेलारा तालुका वासियांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.

हेही वाचा - अरेरे! मोफत मिळतोय तांदुळ तरी होतोय गैरप्रकार; त्या तांदुळाच्या बदल्यात...

रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या नऊ रुग्णांत चार महिला व पाच पुरुष आहेत. त्यातील पाच जण तेल्हारा येथील आहेत. तर उर्वरित राउतवाडी, राजीव गांधी नगर, साईनगर डाबकी रोड, श्रावगी प्लॉट येथील रहिवासी आहेत.

दहा जणांना डिस्चार्ज
शनिवारी रात्री दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते सर्व पुरुष आहेत.या सगळ्यांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले असून त्यात दोघे फिरदौस कॉलनी येथील तर अन्य आळशी प्लॉट, अकोट फ़ैल, खैर मोहम्मद प्लॉट, नानक नगर, इमानदार प्लॉट, समता नगर, मोमीनपुरा, रणपिसेनगर येथील रहिवासी आहेत.

60 वर्षीय महिलेचा मृत्यू
शनिवारी रात्री एका 60 वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही महिला माळीपूरा येथील रहिवासी होती, दि.20 रोजी दाखल झाली होती तिचा 23 मे रात्री मृत्यू झाला.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-387
मयत-24(23+1), डिस्चार्ज-229
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-124


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona positive reports reached 387 in akola district