esakal | COVID19 : महानगरांतून परतणाऱ्यामुळे तपासणी नमुन्यांची ही स्थिती; संशयीतांचे नमुने प्रयोगशाळेकडे
sakal

बोलून बातमी शोधा

corona in washim.jpg

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता देशभरात लॉकडाऊन चार लागू करण्यात आला. त्यामुळे मोल-मजुरी करणाऱ्यांची सर्व कामे ठप्प झाली आहेत.

COVID19 : महानगरांतून परतणाऱ्यामुळे तपासणी नमुन्यांची ही स्थिती; संशयीतांचे नमुने प्रयोगशाळेकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्ह्यात दिवसेंदिवस महानगरांतून परतणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रेडझोन, कोरोनाची लक्षणे असणाऱ्या संशयीत रुग्णांचे नमुने तातडीने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जात आहेत. जेणेकरून कोरोना बाधिताचे तातडीने निदान होणे शक्य होते. या दृष्टीने दोन दिवसांत तपासणीसाठी पाठविलेले 29 नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता देशभरात लॉकडाऊन चार लागू करण्यात आला. त्यामुळे मोल-मजुरी करणाऱ्यांची सर्व कामे ठप्प झाली आहेत. हातचे कामच बंद झाल्यामुळे कमवायचे काय व खायायचे काय? असा प्रश्‍न मजूरदार वर्गासमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महानगरांतून गावाकडे परतणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

आवश्यक वाचा - COVID19 : मुंबई रिटर्नने वाढवली चिंता; या तालुक्यातही कोरोनाची एन्ट्री, गाव सिल

ही वाढती संख्या पाहता ज्या नागरिकांना कोरोना विषाणूची लक्षणे आहेत, कोरोना बाधिताच्या संपर्कातील आहेत, त्यांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब नमुने तातडीने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जात आहेत. जेणेकरून अहवालानंतर तातडीने रुग्णाचे निदान होते. त्यातच मुंबई येऊन परतलेल्या कुटुंबातील महिला कोरोना बाधित असल्याचे समोर आले. तसेच या कुटुंबातील पाच जणांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आले. 

हेही वाचा - सरकारी दवाखान्यांमधील 'रक्त' आटले!, रक्तपेढीत केवळ 39 पिशव्या रक्तसाठा

ही बाब पाहता जिल्ह्यात सध्या सहा कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्येला वेळीच आळा बसण्याच्या दृष्टीने संशयीत रुग्णांचे स्वॅब नमुने तातडीने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. त्यामुळे मंगळवारी (ता.19) 10 व बुधवारी (ता.20) 19 असे एकूण 29 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. या नमुन्यांच्या अहवालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

  • आत्तापर्यंत घेतलेले नमुने....138
  • निगेटिव्ह अहवाल ...........101
  • पॉझिटिव्ह अहवाल.............08
  • अ‍ॅक्टीव रुग्ण...................06
  • अहवाल प्रतिक्षेत ..............29
  • सुट्टी झालेले रुग्ण...............02
  • मृत..............................01
  • ‘तो’ अहवाल निगेटिव्ह

मुंबई येथून येणाऱ्या मूळच्या मालेगाव येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात सहा जण आले होते. त्यापैकी पाच जणांचे अहवाल मंगळवारी (ता.19) ‘पॉझिटिव्ह’ आले होते. तर एकाचा अहवाल प्रतिक्षेत होता. हा अहवाल आज (ता.20) ‘निगेटिव्ह’ आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या कोरोना बाधित सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

29 अहवाल प्रतीक्षेत
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मंगळवारी (ता.19) 10 अहवाल, आज (ता.20) 19 अहवाल प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. असे एकूण 29 अहवाल प्रतीक्षेत आहेत. तर सध्या कोरोना बाधित सहा रुग्णांवर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
-डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशीम

आज पाठविलेले नमुने या ठिकाणचे
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून बुधवारी (ता.20) 19 नमुने तपासणीसाठी पाठविले. यामध्ये रिसोड येथून दोन, मंगरुळपीर येथून 14 तर वाशीम येथून तीन रुग्णांचा समावेश आहे.