कोरोना उपाचारासाठी लागणाऱ्या पीपीई कीटचा मेडीकल कॉलेजमध्ये रेनकोटवर डेमो

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा रुग्ण नसला तरी आढळल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवारी (ता.२६) मेडिकल कॉलेजमध्ये रेनकोट घालून पीपीई कीटचा कसा वापर करावा यासंदर्भातला डेमो स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या वतीने देण्यात आला. 

अकोला : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा रुग्ण नसला तरी आढळल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवारी (ता.२६) मेडिकल कॉलेजमध्ये रेनकोट घालून पीपीई कीटचा कसा वापर करावा यासंदर्भातला डेमो स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या वतीने देण्यात आला. 

     जिल्ह्यात कोरोणामुळे नागरिकांच्या हृदयाची धडकी वाढली आहे. अशातच खबरदारीची उपाययोजना म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कडून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांच्या संरक्षणाच्या पीपीई किट अद्यापही उपलब्ध झालेल्या नाहीत.  त्यामुळे सध्या रेनकोटच्या माध्यमातून या कीट चा कसा वापर करावा यासंदर्भातला डेमो गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या चमूना देण्यात आला. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.रियाज फारूकी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कूमार,  वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवहरी घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्यामकुमार शिरसाम यांच्यासह अन्य उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ppe kit demo at akola medical collage