COVID19 : कोरोनाचा धोका वाढतोय म्हणून येथेही सुरू झाली प्राथमिक वैद्यकीय तपासणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

सांगलीवाला शोरूम जवळ कोरोना बाधित क्षेत्रामधील सर्दी, खोकला, ताप व घसादुखी यारखे आजार असलेल्या नागरिकांची सायंकाळी 7 ते 10 या वेळेमध्‍ये प्राथमिक तपासणी करण्‍यात आली.

अकोला : महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोना संक्रमित रुग्‍णांची वाढती संख्‍या पाहता व यावर प्रभावीपणे नियंत्रण न्यू जोगळेकर प्लॉट येथे रुग्णांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे.

मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये आकोला शहरातील खासगी डॉक्‍टर्स, मेडीकल दुकान चालक व समाजिक कार्यकर्ते यांच्‍या सहकार्याने सर्वप्रथम फतेह चौकस्थित सांगलीवाला शोरूम जवळ कोरोना बाधित क्षेत्रामधील सर्दी, खोकला, ताप व घसादुखी यारखे आजार असलेल्या नागरिकांची सायंकाळी 7 ते 10 या वेळेमध्‍ये प्राथमिक तपासणी करण्‍यात आली. 

आवश्यक वाचा - ...अन् राज्याच्या सत्तेतील भागीदारांचे या निवडणुकीत बिनसले; शिवसेनेला दूर ठेवत काँग्रेसने असे बसवले सत्तेचे गणित

त्यानंतर 7 मेपासून जुने शहर स्थित न्‍यू जोगळेकर प्‍लॉट स्थित डॉ.अलामा इकबाल उर्दू प्राथमिक शाळा येथे प्राथमिक आरोग्‍य तपासणीचे आयोजन करण्‍यात आले आहे. ज्‍यामध्‍ये सायंकाळी 7 ते 10 वाजे दरम्‍यान एकूण 105 नागरिकांची तपासणी करण्‍यात आली आहे. या शिबिरामध्‍ये डॉ.झिशान हुसेन, डॉ.नजर शेख, डॉ. इमरान अहमद, डॉ.दाउद आमीन, डॉ.तस्‍वीर अहमद, डॉ.ताजिन सईद, डॉ.जुबेर अहमद, डॉ.अमीन ईकबाल, डॉ.मौजदर खान, डॉ.अहमद रजा, डॉ.मुजाहिद हसन, डॉ.इब्राहिम अली, डॉ.मोहम्‍मद अयाज, डॉ.वासिक अली यांच्‍या व्‍दारे तपासणीचे काम करण्‍यात येत आहेत. 

तपासणी करिता मौलवी नदीम कासमी व मौलवी आसिफ रजा साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच यावेळी नगरसेवक मो.मुस्‍तफा तसेच सामाजिक कार्यकर्ता मो.फजलू पहेलवान, अफसर कुरैशी, शाळाचे मुख्‍याद्यापक अकिुर्रहमान, शाळा व्‍यवस्‍थापन समितीचे अध्‍यक्ष हाफीस हमीद, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, राजेंद्र टापरे व पश्चिम झोन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A preliminary medical examination of the patient was initiated