COVID19 : विदर्भातील या जिल्ह्यासाठी ‘पॉझिटिव्ह डे’; नऊ अहवाल ‘निगेटिव्ह’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

जिल्हा प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखल्या गेला. मात्र, गेल्या काही दिवसांत मूळचे जिल्ह्यातील असलेले मात्र, कामानिमित्त महानगरांत गेलेल्या नागरिकांचे जत्थे परत येत आहेत.

वाशीम : जिल्ह्यात दिवसेंदिवस महानगरांतून येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे संशयीत रुग्णसंख्येचा आलेख सुद्धा वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांच्या अहवालांपैकी नऊ अहवाल आज (ता.21) प्राप्त झाले आहेत. हे नऊही अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखल्या गेला. मात्र, गेल्या काही दिवसांत मूळचे जिल्ह्यातील असलेले मात्र, कामानिमित्त महानगरांत गेलेल्या नागरिकांचे जत्थे परत येत आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका सुद्धा वाढला आहे. ही बाब पाहता बाहेरून येणार्‍या नागरिकांना स्थानिक पातळीवरच आरोग्य तपासणी करून 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. तर ज्यांना कोरोना संसर्गाची लक्षणे आहेत.

आवश्यक वाचा - भाजपमध्येच ‘बेकी’ अन् म्हणे ठाकरे सरकारमध्ये नाही ‘एकी’; भाजपमधील अंतर्गत वादाचे पुन्हा...

त्यांचे अहवाल प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जात आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाने पाठविलेल्या स्वॅब नमुन्यांच्या अहवालांपैकी आज (ता.21) नऊ अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहेत. तर अद्यापही 23 नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. तर आयसोलेशन वॉर्डमध्ये सध्या सहा कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली आहे.

आजची स्थिती
घेतलेले नमुने........141
पॉझिटिव्ह .............08
निगेटिव्ह ............110
अ‍ॅक्टिव रुग्ण...........06
अहवाल प्रतिक्षेत ......23
सुट्टी झालेले रुग्ण.......02
मृत्यू....................01

सहा कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे आज (ता.21) नऊ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये मंगरुळपीर येथील सात व वाशीम येथील दोन अहवालांचा समावेश आहे. हे सर्व नऊही अहवाल निगेटिव्ह आहेत. तसेच 23 अहवाल प्रतिक्षेत असून, सहा कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्यचिकित्सक वाशीम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reports of 23 suspected patients in the washim district are still awaited