‘मी समाजाचा शत्रू आहे’, बाहेर फिरणारांच्या हातात पोलिसांनी दिले फलक!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

 कोरोना विषाणूविरोधातला लढा हा अधिकच तीव्र झाला आहे.  सरकारने संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे.  मात्र अशाही परिस्थितीत गांभीर्य नसलेली लोकं विनाकारण घराबाहेर पडत आहे. अशा कायदा मोडणाऱ्या लोकांविरोधात खामगाव पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे.

खामगाव (जि.बुलडाणा) :  कोरोना विषाणूविरोधातला लढा हा अधिकच तीव्र झाला आहे.  सरकारने संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे.  मात्र अशाही परिस्थितीत गांभीर्य नसलेली लोकं विनाकारण घराबाहेर पडत आहे. अशा कायदा मोडणाऱ्या लोकांविरोधात शेगाव पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे.

मी समाजाचा शत्रू आहे, मी घरात बसणार नाही अशा आशयाचे पोस्टर्स त्यांनी संबंधित बाहेर फिरणाऱ्यांच्या हातात दिले जात आहेत. कमीत कमी असं केल्यावर तरी लोक घराबाहेर पडणार नाहीत, असा मानस ठेऊन ही मोहिम पोलिसांनी सुरू केली आहे.

Image may contain: 2 people, people standing, beard and outdoor

प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत हेच वाढणाऱ्या गर्दीतून अधोरेकित होत आहे. तेव्हा घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यापेक्षा त्याअगोदरचं पाऊल म्हणून शेगाव पोलिसांनी ही मोहिम सुरू केली आहे. मात्र या मोहिमेनंतरही लोकांनी ऐकलं नाही तर आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलिसांनी अनेक ठिकाणी काठ्यांचा प्रसाद दिला होता. पुणे, औरंगाबाद, अकोला, नागपूर, अमरावती तसेच जालना या ठिकाणचे व्हीडिओही सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाले आहेत. लोकांनी देखील पोलिसांच्या या कृत्यांचं समर्थन केलं आहे. ज्यांना समजूतदारपणाची भाषा समजत नाही त्यांना अशीच शिक्षा देणं गरजेचं असल्याचे मत नागरिक सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shegaon police action in Buldana district