धक्कादायक : अकोल्यात आज नव्याने आढळले 18 रुग्ण, एका महिलेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच आता कोरनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र असे जरी असले तरी बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. तर सोबतच आज पुन्हा नव्याने 18 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

 

अकोला  : अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच आता कोरनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र असे जरी असले तरी बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. तर सोबतच आज पुन्हा नव्याने 18 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

बुधवारी एकूण 120 अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 102 अहवाल तर 18 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आज सकाळी  पॉझिटीव्ह आढळलेल्या १८ रुग्णात  नऊ महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील सात जण खैर मोहम्मद प्लॉट मधील रहिवासी आहेत. तर तिन जण गवळीपुरा, तीन जण रामनगर, आणि बापू नगर अकोट फैल, अकोट फैल, सराफा बाजार, जुने शहर पोलीस स्टेशन, जुने आलसी प्लॉट येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.

एका महिलेचा मृत्यू
दरम्यान एक ६२ वर्षीय न्यू भिमन्गर येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू काल रात्री झाला आहे. ही महिला सोमवार ४ मे रोजी दाखल झाली होती.

41 जण कोरोना मुक्त
तसेच मंगळवारी रात्रीच ४१ रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज करण्यात आले. हे रुग्ण सिंधी कॅम्प, कृषि नगर,  अकोट फैल व बैदपूरा येथील रहिवासी आहेत.

कोरोना अपडेट

  • एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१८६
  • मयत-१५(१४+१),डिस्चार्ज-६०
  • दाखल रुग्ण(अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१११

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: 18 new patients found in Akola today, one woman dies