COVID19 : सायलेंट कॅरिअर ठरतोय धोकादायक, रहा जरा जपून...70 टक्के रुग्णांमध्ये नाहीत आढळत लक्षणे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

सर्दी, ताप खोकला ही कोरोनाची अगदीच सामान्य लक्षणे आहेत. परदेश प्रवास किंवा हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि सोबत अशी लक्षणे दिसली तर तातडीने त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाते.

अकोला : जगभरात आपले हात पाय पसरणारा कोरोना आता दिवसेंदिवस अधिक घातक होत चालला आहे. कारण, तपासणी करुन आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर योग्य ते उपचार आणि त्या व्यक्तीपासून कुणाला संसर्ग होऊ नये याची खबरदारी आपण घेत आहोत.

मात्र अशा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती पेक्षाही जास्त धोका आहे तो कोरोनाच्या सायलेंट कॅरिअरचा. कोरोनाचे सायलेंट कॅरिअर आणि त्यांच्याकडून होणारे धोके गंभीर असून, सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - Video : तुम्हाला माहिती आहे आयपीएल प्लेअर काय करतोय अकोल्यात?, रणजी आणि अंडर 19 चे खेळाडूंचा जाणून घ्या
दिनक्रम

सर्दी, ताप खोकला ही कोरोनाची अगदीच सामान्य लक्षणे आहेत. परदेश प्रवास किंवा हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि सोबत अशी लक्षणे दिसली तर तातडीने त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाते. मात्र कोरोनाची सध्याच्या काळातली लक्षणे काही ठिक नाहीत. कारण कोरोना शरीरात ठाण मांडून बसल्यानंतरही त्याची कोणतीच लक्षणे दाखवत नाही. आणि यामुळेच आता सगळ्याच वैद्यकीय तज्ज्ञांना बुचकळ्यात पडले आहेत. सायलेंटली शरिरात प्रवेश करणाऱ्या आणि कोणतीच लक्षणे न दाखवणाऱ्या अशा व्यक्ती कोरोनाचे सायलेंट कॅरिअर ठरत आहे.

आवश्यक वाचा - अरे वा! गावाच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत

सायलेंट कॅरिअर म्हणजे नेमकं काय?
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण सायलेंट कॅरिअर आहेत. म्हणजे 70 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची सामान्य लक्षणे सुद्धा दिसत नाहीत. सर्दी, ताप, खोकला ही सामान्य लक्षणे असलेल्या कोरोना व्हायरसची वर्तवणूक बदलत आहे. असे लोक ज्यांना कोरोनाची लागण तर झाली पण त्यांच्यात लक्षणे दिसली नाहीत किंवा बऱ्याच उशीरा दिसली. 

याच अहवालात अशा कोरोना कॅरिअरचा उल्लेख सायलेंट कॅरिअर असा केला गेला आहे. सायलेंट कॅरिअर असणारे हेच लोक त्यांच्या आजूबाजूला कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. सामान्यत: कोरोनाची लक्षणे पाच दिवसात बघायला मिळतात. पण या लोकांमध्ये तीन आठवड्यानंतर लक्षणे दिसतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silent career is becoming dangerous in akola district, so be careful