धोक्याची घंटा: बुलडाणा जिल्ह्यात आज पुन्हा तिन कोरोना पॉजिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

राज्यात कोणाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत असताना बुलडाणा जिल्ह्यात विशेषतः शहरात यायचा प्रसार वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत पाच कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले होते. मात्र, रविवारी आलेल्या अहवालानुसार आणखी तीन रुग्णांची भर पडली. दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमावरून परतलेले हे तीन व्यक्ती चिखली, देऊळगावराजा आणि खामगाव येथील असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

 

बुलडाणा  : राज्यात कोणाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत असताना बुलडाणा जिल्ह्यात विशेषतः शहरात यायचा प्रसार वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत पाच कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले होते. मात्र, रविवारी आलेल्या अहवालानुसार आणखी तीन रुग्णांची भर पडली. दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमावरून परतलेले हे तीन व्यक्ती चिखली, देऊळगावराजा आणि खामगाव येथील असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

बुलडाणा जिल्ह्यातील पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या आता आठवर पोहचली असून जिल्ह्यासाठी ही चिंतेची बाब आहे.

बुलडाणा शहरातील एका 45 वर्षीय व्यक्तीचा कोरोना प्रादुर्भाव झाल्याने मृत्यू झाल्याची घटना 29 मार्चला घडली होती. त्यानंतर त्या व्यक्तीच्या संबंधित तसेच अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या व्यक्तींचे नमुने पाठविण्यात आले होते. दरम्यान, बुलडाणा शहरातील नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान दिल्ली येथील मरकज या धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्यांपैकी चिखली, देऊळगावराजा आणि खामगाव येथील प्रत्येकी एक असे तीन व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. 

यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्या आता 8 वर गेली असून, त्यातील एक जण आधीच मृत झालेला आहे. कोरोना बाधीतांच्या संपर्कामुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे कळते. यामुळे, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे झाले असून प्रशानस आता काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Corona positive again in Buldana district today