एका दुहेरी हत्याकांडासह अकोल्यात तीन खून, टाळेबंदी शिथिल होताच गुन्हेगारीने काढले डोके वर

भगवान वानखेडे 
Thursday, 28 May 2020

गुन्हेगारीच्या पटलावर ठळक नामोल्लेख असलेल्या अकोला जिल्ह्यात मेच्या शेवटच्या आठवड्यात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे काही दिवसात एका दुहेरी हत्याकांडासह तीन खून झाले असून अगदी शुल्लक कारणे विकोपाला गेले असल्याची माहिती यातून समोर येत आहे.

अकोला : गुन्हेगारीच्या पटलावर ठळक नामोल्लेख असलेल्या अकोला जिल्ह्यात मेच्या शेवटच्या आठवड्यात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे काही दिवसात एका दुहेरी हत्याकांडासह तीन खून झाले असून अगदी शुल्लक कारणे विकोपाला गेले असल्याची माहिती यातून समोर येत आहे.

टाळेबंदी मध्ये अवघ्या काही किरकोळ गुन्ह्यांची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाली होती मात्र टाळेबंदी जशी शिथिल झाले आणि गुन्हेगारीने डोके वर काढले यामध्ये दारू पिऊन घडलेल्या वादाचे रूपांतर अगदी एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत जाऊन पोहोचल्याने अकोला पोलिस विभागाची ही डोकेदुखी वाढली आहे दुहेरी हत्याकांड सह घडलेल्या तीन मर्डर मधील आरोपी सध्या जेरबंद जरी असले तरी घडलेले गुन्हे अकोले करांच्या चिंतेत भर टाकणारे असेच आहेत.

काही दिवसांच्या अंतरावर घडले गुन्हे
एमआयडीसीतील एका निर्माणाधीन कंपनीमध्ये काम करणार्‍या दोन मजुरांमध्ये वाद होऊन एक आणि दुसऱ्याचा खून केल्याची घटना घडली होती घटना घडते ना घडते तोच सिविल लाइन पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या खरच येते खरकटे पाणी टाकले या कारणावरून बापल एकाची हत्या करण्यात आली होती तर बाळापूर तालुक्यातील मांजरी येथे दारू पिऊन झालेल्या वादात एका जनाचा खून करण्यात आला होता अशातच आज पुन्हा बोरगाव मंजू येथे एका जणांचा खून करण्यात आला आहे

डिटेक्शन शंभर टक्के मात्र प्रेवेंशनकडे द्यावे लक्ष
अकोला जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात अकोला पोलिसांना आतापर्यंत तरी शंभर टक्के यश आले आहे यामध्ये स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक यांना यश आले आहे मात्र हे गुन्हे कसे रोखले जातील याकडेही आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three murders in Akola, including a double murder, the culprit was beheaded as soon as the lockout was relaxed