तीनशे परप्रांतीय शहरवासींसाठी डोकेदुखी!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

चार कंटेनरमधून तीन राज्यातून आलेल्या 300 परप्रांतीयांमुळे शहरातील नागरिक धास्तावले आहेत. या नागरिकांना येथील शासकीय तंत्रनिकेतन इमारतीत ठेवण्यात आले असून, त्यांच्या सरबराईत संपूर्ण प्रशासन गुंतले आहे. या नागरिकांनी सामाजिक दुराव्याचा आदेश धुडकावला असून, यातील अनेकजण आजारी असल्याची माहिती आहे. शासनाचे आदेश असले तरीही हे परप्रांतीय त्यांच्या प्रांतामध्ये परत पाठवावेत अशी मागणी होत आहे.

 

वाशीम : चार कंटेनरमधून तीन राज्यातून आलेल्या 300 परप्रांतीयांमुळे शहरातील नागरिक धास्तावले आहेत. या नागरिकांना येथील शासकीय तंत्रनिकेतन इमारतीत ठेवण्यात आले असून, त्यांच्या सरबराईत संपूर्ण प्रशासन गुंतले आहे. या नागरिकांनी सामाजिक दुराव्याचा आदेश धुडकावला असून, यातील अनेकजण आजारी असल्याची माहिती आहे. शासनाचे आदेश असले तरीही हे परप्रांतीय त्यांच्या प्रांतामध्ये परत पाठवावेत अशी मागणी होत आहे.

शहरामध्ये मंगळवारी (ता.31) चार कंटेनरभरून राजस्थानी नागरिक पोलिसांना आढळून आले होते. पोलिसांनी हे चार कंटेनर जप्त करून कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील 300 नागरिकांची राहण्याची व जेवनाची सोय येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत केली होती. मात्र, आज (ता.2) येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत फेरफटका मारला असता, भयावह वास्तव समोर आले आहे. हे परप्रांतीय नागरिक प्रशासनाची कोणतीच सूचना मानत नसल्याचे दिसून आले. एकमेकांपासून एकमीटर अंतर ठेवण्याच्या सूचना केल्या असता, त्यांनी ते आक्रमकपणे धुकडावून लावत एकाचठिकाणी गर्दी केल्याचे दिसून आले. यातील अनेक नागरिकांना खोकला व तापेचा त्रास असल्याने ही परप्रांतीय बँक शहरात नको अशी मागणी शहरवासींमधून केली जात आहे.

जेवनाबाबत प्रचंड तक्रारी
या नागरिकांच्या सोयीसाठी तहसीलदार, पोलिस प्रशासन गुंतले आहे. शिवभोजन योजना व इतरही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या नागरिकांना दोनवेळ भरपेट भोजन दिल्या जाते. मात्र, जेवन व्यवस्थीत नसल्याच्या तक्रारी करून ते आक्रमकपणे अधिकार्‍यांच्या अंगावर येत असल्याचे चित्र आहे. शिवभोजन योजनेत मिळणारे भोजन उत्कृष्ट असूनही जमावाच्या बळावर येथील प्रशासन या परप्रांतीयांनी वेठीस धरल्याचे चित्र समोर आले आहे.

तपासणीतही असहकार
प्रशासनाच्या वतीने या नागरिकांच्या जेवनाबरोबरच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेत आहे. मात्र, या नागरिकांची तपासणी करताना ते सहकार्य करीत नसल्याचे चित्र समोर आले आहे. तसापणी करताना पंधरा ते वीसच्या घोळक्याने एकदमच डॉक्टरांजवळ येऊन थातूर मातूर उत्तरे देण्यात येत आहेत. त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर असून, जिल्हाधिकारी यांनी या नागरिकांना परत पाठविण्याबाबत त्वरीत निर्णय घेण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim headache for three hundred ethnic citizens!