संचारबंदीचे उल्लंघन करणे पडले महाग!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने संपूर्ण देशभरात ता. 25 मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या 439 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 171 वाहन धारकांवर गुन्हे दाखल करून 171 वाहने सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहेत.  त्यामुळे संचारबंदीदरम्यान नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलिस दलाकडून केले जात आहे.

 

वाशीम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने संपूर्ण देशभरात ता. 25 मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या 439 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 171 वाहन धारकांवर गुन्हे दाखल करून 171 वाहने सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहेत.  त्यामुळे संचारबंदीदरम्यान नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलिस दलाकडून केले जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने देशात 21 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात संचारबंदी लागू करून, जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी आठ ते दुपारी 12 पर्यंत वेळ ठरवून दिली आहे. या वेळेव्यतिरिक्त विनाकारण घराबाहेर फिरणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. तसेच संचारबंदीचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने केले जात आहे. जिल्ह्यात ता. 21 मार्च ते बुधवार (ता.9) दरम्यान संचारबंदी, जिल्हाबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम आदी कलमान्वये 439 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तसेच 171 वाहन धारकांवर गुन्हे दाखल करून 171 वाहने सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या स्तरावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात विशेष पोलिस पथकाचे गठण देखील करण्यात आले आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडूच नये. तुम्ही घरी राहणेच सुरक्षीत आहे. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. तसच कोरोना विषाणूशी खंबीरपणे लढा देऊ शकू.
-वसंत परदेशी, जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम

उंबरठा ओलांडण्यापूर्वी स्वतःस दहावेळ विचारा...
बरेच नागरिक जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली घराबाहेर पडतात. सोबतच एकटेच जात नाहीत. तर घरातील एकदोन सदस्य सुद्धा सोबत नेतात. त्यामुळे प्रत्येक नागरिक तोपर्यंत सुरक्षीत आहे. तो जोपर्यंत घरातून बाहेर पडत नाही. मात्र, याची कुणाला गांभिर्य नसल्यासारखे वागत आहेत. खरच भाजीपाल्याची सर्वांनाच दररोज आवश्यकता आहे काय?,  दोन-चार दिवस भाजीपाला मिळाला नाही तर चालणार नाही का?, दररोजच किराणा संपतो काय? एकंदरीतच आपण घराबाहेर पडण्याची खरचं गरज आहे का? हा प्रश्‍न प्रत्येकाने घराचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी दहावेळा विचारलेला बरा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim 439 people have been charged