esakal | घरीच राहून करता येते बरंच काही, पहा यांनी काय केले? 
sakal

बोलून बातमी शोधा

washim Distribution of free masks to needy from Verma families at Risod

संचारबंदीमुळे अनेक कुटुंबे पापड, चटण्या, नवनवीन पदार्थ बनवीत आहेत. तसेच अन्य घरगुती कामांत बरेच कुटुंब व्यस्त आहेत. मात्र, येथील बालाजी नगर मधील पार्वती ताराचंद वर्मा आणि त्यांचे कुटुंबीय शिलाई मशिनवर मास्क तयार करीत आहेत. हे मास्क विनामूल्य तहसीलदार अजीत शेलार व नगर परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्यामार्फत गरजूंपर्यंत पुरवत आहेत.

घरीच राहून करता येते बरंच काही, पहा यांनी काय केले? 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रिसोड (वाशिम) : संचारबंदीमुळे अनेक कुटुंबे पापड, चटण्या, नवनवीन पदार्थ बनवीत आहेत. तसेच अन्य घरगुती कामांत बरेच कुटुंब व्यस्त आहेत. मात्र, येथील बालाजी नगर मधील पार्वती ताराचंद वर्मा आणि त्यांचे कुटुंबीय शिलाई मशिनवर मास्क तयार करीत आहेत. हे मास्क विनामूल्य तहसीलदार अजीत शेलार व नगर परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्यामार्फत गरजूंपर्यंत पुरवत आहेत.

येथील ताराचंद वर्मा यांच्या पत्नी पार्वती यांनी आपल्या घरगुती शिलाई मशीनद्वारे त्यांच्या कुटुंबालातील पायल, खुशी, चंचल, मिनाक्षी हे सर्व सदस्य मास्क तयार करण्यासाठी मदत करीत आहेत. दैनंदिन घरगुती कामातून उरणारा वेळ मास्क तयार करण्यासाठी उपयोगी आणत आहेत. कोणताही मोबदला न घेता वर्मा दांपत्य आणि त्यांची मुले या कामाद्वारे सामाजिक बांधिलकी जपत आहेत.

दिवसभरातील या कुटुंबातील सदस्यांकडून दिडशेवर मास्क तयार केले जात आहेत. त्यासाठी लागणारे कापड, लेस व अन्य साहित्य त्यांनी स्वखर्चाने उभारले आहे. हे तयार झालेले मास्क महसूल प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जनतेपर्यंत पोचवत त्यांच्यात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करत आहेत.

मास्क तयार करणे हा आमच्यासाठी नवीनच प्रकार होता. संचारबंदीमुळे लहान मुलांनी सुद्धा घरातच बसून मास्क तयार करण्याची कला आत्मसात केली. सामाजिक कार्याला आमचाही थोडाफार हातभार लागत असल्याचे समाधान आहे.
-पार्वती वर्मा, रा. रिसोड, जि.वाशीम