दिलासादायक : वाशीम जिल्हा कोरोनामुक्तीकडे, आज दोन्ही अहवाल आले निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

वाशीम येथील कोरोनाबाधीत रूग्णाचे दोन अहवाल विस दिवसानंतर निगेटिव्ह  आले असून या रूग्णाला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. 

 

वाशीम: जिल्ह्यामधे एकमेव असलेल्या कोरोनाबाधीत रूग्णाचे दोन अहवाल विस दिवसानंतर निगेटिव्ह  आले असून या रूग्णाला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी ॠषिकेश मोडक यांनी दिली आहे. 

वाशीम जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे 
मेडशी येथील एका इसमाला कोरोनाची बाधा झाली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून त्याच्यावर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयच्या विषेश कक्षात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पंधरा दिवसांपूर्वी त्याच्या घशातील लाळेचे नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले होते. तेव्हा ते नमुने निगेटिव्ह आले होते.

हेही वाचा - कोरोनात मद्यपींचे वांदे झाल्याने घडतायेत असे धक्कादायक प्रकार?

त्यानंतर पुन्हा आठ दिवसापूर्वी चोवीस तासानंतर पुन्हा नमुने घेतले होते. मात्र तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे नमुने पुन्हा पॉझिटिव्ह आले होते. यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली होती. या रुग्णाला आता पुन्हा आठ दिवस उपचार केल्यानंतर पुन्हा या रूग्णाचे  लाळेचे नमुने निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी ॠषिकेश मोडक यांनी दिली आहे.  या रूग्णाला सुट्टी देण्यात येणार आहे.  यामुळे आता वाशीम जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim district corona patient report are negative marathi news