कोरोनाला हा जिल्हा ठरला होता अपवाद, मात्र एकाच दिवशी आढळले तब्बल एवढे पॉझिटिव्ह रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

संपूर्ण राज्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाच्या प्रभावात वाशीम जिल्हा अपवाद ठरला होता. ग्रिनझोनमधे असलेल्या या जिल्ह्यात आज तब्बल पाच जणांचे घशातील स्त्त्रावाचे नमुने पाॅझीटिव्ह आले आहेत यामुळे संपूर्ण जिल्हाभर खळबळ उडाली आहे. 

 

वाशीम: संपूर्ण राज्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाच्या प्रभावात वाशीम जिल्हा अपवाद ठरला होता. ग्रिनझोनमधे असलेल्या या जिल्ह्यात आज तब्बल पाच जणांचे घशातील स्त्त्रावाचे नमुने पाॅझीटिव्ह आले आहेत यामुळे संपूर्ण जिल्हाभर खळबळ उडाली आहे. 

कोरोना बाधित महिलेसोबत तिच्या कुटुंबातील मुंबई येथून वाशिम येथे आलेल्या ६ व्यक्तींना आयसोलेशन कक्षात दाखल करून, त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने १६ मे रोजी तपासणीसाठी अकोला येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५ अहवाल आज सकाळी प्राप्त झाले असून, या पाचही व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. याच कुटुंबातील एका व्यक्तीचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

कोरोना बाधित पाचही व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर मुंबई येथून आलेल्या कोरोना बाधित महिलेसोबतच थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आल्याने त्यांचा जिल्ह्यात इतरांसोबत संपर्क आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यामध्ये इतरत्र संसर्ग होणार नसल्याची बाब आरोग्य विभाग सांगत आहे. मुख्य म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यात जे कोरोना रूग्ण आढळून आले ते सर्व जिल्ह्याबाहेरील होते. मुंबईवरून येताना ज्या महिलेचा वैद्यकीय अहवाल सकारात्मक आला होता त्याच महिलेसोबत इतर सहजण प्रवास करीत होते त्यापैकीपाच ज पाॅझीटिव्ह आढळून आले आहेत तर एका जणाचा अहवाल प्रलंबित आहे.  सध्या जिल्ह्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून येणार्यांची रांग लागली आहे. काहींना जिल्हा परिषद शाळेत तर बहुसंख्य नागरीकांना होम क्वारंटाईन केले आहे.  होम क्वारंटाईन केलेल्या नागरीकाचा समुह संपर्क येत नसला तरी घरातील इतरांनापासून हा संसर्ग होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim district was an exception to the Corona, but found so many positive patients on the same day