कोरोना बाजूला; नेते लागले श्रेय लाटण्याच्या कामाला!

संजय अलदर
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

तालुक्यात नेतेमंडळीकडून कुठे मास्क, चहा, अन्नधान्य वाटप केले जात आहे. मात्र, बहुतांश वाटप करणारे नेते मंडळी दोन चार गरजू लोकांना वस्तूंचे वाटप करतात. त्यानंतर सदरील घटनेचे फोटो काढून समाजमध्यमांवर प्रसारीत करून दातृत्त्वाचा आव आणत आहेत. तसेच आपल्या कार्याला समाजमाध्यमांवर वाहवाह मिळवत आहेत.

 

मानोरा (जि.वाशीम):  तालुक्यात नेतेमंडळीकडून कुठे मास्क, चहा, अन्नधान्य वाटप केले जात आहे. मात्र, बहुतांश वाटप करणारे नेते मंडळी दोन चार गरजू लोकांना वस्तूंचे वाटप करतात. त्यानंतर सदरील घटनेचे फोटो काढून समाजमध्यमांवर प्रसारीत करून दातृत्त्वाचा आव आणत आहेत. तसेच आपल्या कार्याला समाजमाध्यमांवर वाहवाह मिळवत आहेत.

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व प्रकारे उपाय योजना करताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमांद्वारे जनजागृती करीत आहे. जेणेकरून नागरिक संसर्गापासून बचाव करू शकतील. राष्ट्रावर आलेले संकट हे खूप मोठे आहे. त्यामुळे समाजातील अनेक दानशुरांना मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला साद देत अनेकांनी आपापल्या परीने मदतही केली आहे. मात्र, कुणी या मदतीची प्रसिद्धी करताना दिसत नाही. परंतु,  तालुक्यात काही नेते मंडळी मदत वाटपाचाही गाजावाजा करीत आहेत. काहींनी तर हद्दच केली आहे. चार, पाच पोळ्या, लहानशा डब्यात भाजी, पाणी देऊन फोटो काढणे, 5-25 मास्क, 5 -10 कप चहा वाटप करून ठिकठिकाणी फोटो, चित्रिकरण करून समाजमाध्यमांवर प्रसारीत करीत आहेत. तालुक्यत अनेक स्वस्त धान्य दुकान आहेत. परंतु काही निवडक दुकानात आपल्या मर्जीतील व्यक्तींना मोफत धान्य वाटप करण्याच्या बढाया मारीत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे हा खोटा दातृत्वाचा आव कशासाठी? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गाजावाजा करणे कितपत योग्य?
आपण ज्या देशात, राज्यात, समाजात राहतो. त्या समाजाचे, राज्याचे, देशाचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे. संकट काळात दिलेल्या मदतीची दखल घेणे एक भाग आहे. मात्र, या मदतीचा गाजावाजा करणे हे कितपत योग्य आहे. समाजमाध्यमांवर सध्या अशा प्रकारालाच पेव फुटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Washim leaders loot credit