लॉकडाउनमुळे मुलीनेच वडिलांना दिला मुखाग्नी!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

केंद्र शासनाने 3 मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला. लॉकडाउनमुळे कोणत्या नातेवाइकाकडे किंवा कुटुंबातील कुणाचे निधन झाले तरी येता-जाता येत नाही. कारंजा नगर परिषदचे शिपाई ज्ञानेश्वर गणपतराव जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने 15 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांना अक्षय नावाचा एकुलता एक मुलगा व दोन मुली आहेत. कामानिमित्त अक्षय हा इंदूर (मध्य प्रदेश) येथे असल्याने वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी येण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, लॉकडाउनमुळे त्याला कारंजा येथे येणे शक्‍य झाले नाही.

कारंजा (जि.वाशीम) : कारंजा नगर परिषदेचे शिपाई ज्ञानेश्वर जाधव यांचा 15 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू झाला. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी एकुलता एक मुलगा लॉकडाउनमुळे इंदूर येथून येऊ न शकल्याने लहान मुलगी रिमा हीने वडिलांना मुखाग्नी दिला.

केंद्र शासनाने 3 मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला. लॉकडाउनमुळे कोणत्या नातेवाइकाकडे किंवा कुटुंबातील कुणाचे निधन झाले तरी येता-जाता येत नाही. कारंजा नगर परिषदचे शिपाई ज्ञानेश्वर गणपतराव जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने 15 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांना अक्षय नावाचा एकुलता एक मुलगा व दोन मुली आहेत. कामानिमित्त अक्षय हा इंदूर (मध्य प्रदेश) येथे असल्याने वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी येण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, लॉकडाउनमुळे त्याला कारंजा येथे येणे शक्‍य झाले नाही.

लहान मुलगी रिमा हीने वडिलांचा मुखाग्नी दिला. मुलगा हा वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी येऊ शकला नसल्याने किमान दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी ता. 24 एप्रिल रोजी त्याला कारंजा येथे येण्यासाठी रितसर परवानगी द्यावी. अशी मागणी मृतक जाधव यांच्या पत्नी व दोन मुलींनी कारंजाचे तहसीलदार मांजरे यांच्याकडे केली. शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश बाबरे यांनी अर्ज करून मुलाला कारंजा येथे येण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim news due to lockdown, the girl gave a facelift to her father!