...या ग्रंथात दिला आहे सोशल डिस्टंसिंगचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

1945 च्या काळात प्लेग, कॉलरा, पटकी सारख्या साथरोगाने थैमान मांडलेले असताना या साथरोगकाळात कुणीही गावाबाहेर ऐक दिवसही पडू नका अन्यथा गावावर मोठे संकट ओढवेल असे संकेत नाथ नंगे महाराजांनी दिले होते.

 

डोंगरकिन्ही (जि.वाशीम) : घटकाभरही घरात असह्य होत असताना नाथ नंगे महाराज साथ इ. स. 1917 मध्ये एन्फ्ल्युएंझाच्या साथरोगकाळी सलग सहा महिने एकांतस्थळी राहील्याचा उल्लेख आहे. त्यासोबतच 1945 ला साथरोगकाळात नंगेबाबांच्या गावाबाहेर न पडण्याची सूचना ऐका व्यक्तीच्या अवज्ञेमुळे लहानशा डव्ह्यात तब्बल  45 जण या साथरोगाला बळी पडल्याचा उल्लेख विश्वनाथ महाराज रचीत श्री विश्वजीवन ग्रंथात येतो.

या ग्रंथात साथरोगाचा टोपण नाव ‘बयजी‘ असा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे कोरोना या साथरोगकाळात विश्वजीवन ग्रंथ बोधप्रद ठरत आहे. दरम्यान श्री नाथनंगे महाराज (श्रीक्षेत्र डव्हा) संस्थानने  एक लाख रुपयांची देणगी शासनाला गुरुवारी (ता.3) दिली आहे.

Image may contain: 2 people, people sitting
नाथनंगे महाराज व विश्वनाथ महाराज

‘आठवडा वदी रजीस्टरा ।
पंचेचाळीसवर धरा ॥
आकडा तयाचा झाला पुरा ।
बयजीचा प्रताप ॥111॥

ह्या अभंग रचनेसह 1962 ला रचलेल्या श्री विश्वजीवन ग्रंथातील चौथ्या अध्यायातील 73 व्या अभंगांपासून 113 व्या अभंगापर्यंतची रचनावरून 1945 च्या काळात प्लेग, कॉलरा, पटकी सारख्या साथरोगाने थैमान मांडलेले असताना या साथरोगकाळात कुणीही गावाबाहेर ऐक दिवसही पडू नका अन्यथा गावावर मोठे संकट ओढवेल असे संकेत नाथ नंगे महाराजांनी दिले होते. त्यानंतरही  बाजारहाटेसाठी ऐक महिला बाहेर गावाला गेली अन या साथरोगाला बळी पडली. त्या महिलेला स्मशानात नेतो न नेतो तोच रोगाची लागण पसरल्याने दहा-बारा जण दगावले. बयजीने केला कहर । लहानथोर सर्वांवर। नाही आली तिला कदर कोणाचीही ॥  त्या काळात शंभराच्या आसपास घरे असणार्‍या डव्हा गावातील पंचेचाळीस जण बळी ठरल्याच्या आशयाचा उल्लेख आलेला आहे. आणि नाथनंगे महाराज यांच्या कृपेने साथरोगातून गाव मुक्त झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

बयजीची केली बोळवण । सुखी झाले सर्वजण ।
प्रेमभावे आनंदघन । डव्हेगावी ॥

No photo description available.
श्री विश्वनाथ महाराज रचित श्री विश्वजीवन ग्रंथ

घरातच राहण्याचे ग्रंथातून केले आवाहन
तसेच 1917 मध्ये एनफ्ल्युएंझाची साथ सुरू असताना नाथनंगे महाराज प्रथम नागरतासच्या नदीतीरावर आढळले नंतर काही महिने चाक्यावर ( चाकातिर्थ) आणि पूनश्‍च निर्मनुष्य असणार्‍या काळामाथ्यावर सहा महिने एकांतस्थळी राहिले अशा आशयाचा उल्लेख संत विश्वनाथ बाबा रचीत विश्वजीवन ग्रंथाच्या प्रास्ताविकेत आढळतो. अशाच आशयाचे संदर्भ देऊन श्री नाथ नंगे महाराज संस्थानचे सचिव गोवर्धन महाराज राऊत यांनी ह्या ग्रंथाचा बोध घेऊन कोरोनाच्या संसर्गजन्य आजारापासून स्वतःच्या संरक्षणासाठी घरातच राहण्याचे आवाहन समाजमाध्यवरून केलेले आहे.

संस्थानतर्फे एक लाखाची मदत
श्रीक्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराज संस्थानच्या वतीने ुमुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी शासनाला एक लाख रुपयांची देणगी गुरुवारी संस्थानचे अध्यक्ष सुरेशराव घुगे व उपाध्यक्ष डॉ. निवासराव मुंढे यांनी मालेगावचे तहसीलदार रवी काळे यांना धनादेशाद्वारे सुपूर्द केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim news... old book contains the message of social distancing