लॉकडाऊन नव्हे ही तर कल्पकतेची सुवर्णसंधी, नव्या व्यवसायाचा झाला उदय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

कोरोनाच्या धास्तीने संपूर्ण राज्यात दिड महिन्यापासून लॉकडाऊन आहे. सर्व नागरीक घरात आहेत. व्यापारउदिम ठप्प झाले आहे.  या परिस्थितीत मात्र बळीराजा बांधांवर अहोरात्र कष्ट उपस्थित आहे. लॉकडाऊने हताश न होता सवड येथील शेतकर्यांनी या लॉकडाऊनच्या मंदीवर मात करीत गोडवा पेरणारा उद्योग उभा केला आहे.

 

वाशीम:  कोरोनाच्या धास्तीने संपूर्ण राज्यात दिड महिन्यापासून लॉकडाऊन आहे. सर्व नागरीक घरात आहेत. व्यापारउदिम ठप्प झाले आहे.  या परिस्थितीत मात्र बळीराजा बांधांवर अहोरात्र कष्ट उपस्थित आहे. लॉकडाऊने हताश न होता सवड येथील शेतकर्यांनी या लॉकडाऊनच्या मंदीवर मात करीत गोडवा पेरणारा उद्योग उभा केला आहे. लॉकडाऊने शेतात लावलेला ऊस वाया जावू न देता गुर्हाळ सुरू केले आहे. 

रिसोड शहराच्या कुशीत आणि मुशीत असलेलं एक टुमदार गाव ,नावातच कुठलाही काना मात्रा वेलांटी नसलेलं नावाप्रमाणेच सरळ साधं सोपं दिलदार, मेहनती प्रचंड कष्ट करणार तसेच राजकारणात आणि समाजकारणात सुध्दा आघाडीवर असलेलं गाव म्हणजेच सवड.

सध्या कोरोनाव्हायरस चे संकट उभे राहिल्या मुळे संपूर्ण जनजीवन प्रभावित झाले आहे,पण याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना. पण अशाही परिस्थितीमध्ये धीर न सोडता रसवंतीचा व्यवसाय बंद झाल्यामुळे आता या उसाच काय करावं असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला. श्री. हरिभाऊ गाडे, संतोष लाटे, सतीश सोनुने आणि राजकारणात मातब्बर असलेले पण मुळात शेतकरी असलेले वाशिम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री गजानन रावजी लाटे या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गुऱ्हाळ सुरू करण्याचे नियोजन केलं.

Image may contain: one or more people and outdoor

असा उभारला व्यवसाय
या सर्व शेतकऱ्यांचा ऊस हा आधी रसवंती ला जायचा, गुऱ्हाळ चालवण्याचा कुठलाही अनुभव त्यांच्या पाठीशी नव्हता, आणि अशातच लॉक डाऊन आणि संचारबंदी ची परिस्थिती, पण अतिशय कमी वेळेमध्ये या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नियोजनपूर्वक गुऱ्हाळ सुरू करून गुळ निर्मितीचा व्यवसाय सुरू केला, आज या ठिकाणी दिवसाला 15 क्विंटल गूळ निर्मिती केली जाते सोबतच परिसरातील शेतकऱ्यांचा सुद्धा ऊस या ठिकाणी गाळप केला जातो, गूळ हा संपूर्ण पणे सेंद्रिय पद्धतीने बनवला जातो कुठल्याही रसायनाचा वापर यामध्ये केल्या जात नाही.आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान यांनी देशातील नागरिकांना आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला दिला, हे शेतकरीसुद्धा आत्मनिर्भर बनत आहेत. खरं तर या देशाचा पोशिंदा हा शेतकरी आहे पण नेहमी कधी अस्मानी-सुलतानी यासारख्या अनेक संकटाचा सामना हा शेतकऱ्यांना करावाच लागतो त्यात कोरोनाव्हायरस चे हे संकट त्यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न या जिद्दी आणि मेहनती शेतकऱ्यांनी केला. लॉकडाऊने हताश न होता या शेतकर्यांनी कल्पकता वापरून नव्या उद्योगाला जन्म दिला आहे. 

Image may contain: 1 person, selfie and close-up

चर्चेतून उभारलं गुऱ्हाळ
वाशीम ते रिसोड महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. दरवर्षी या रोडवर शेतकरी रसवंतीचा व्यवसाय करतात मात्र यावर्षी लाॅकडाऊन ने व्यवहार चक्र थांबले. शेतात लावलेला ऊस वाया जावू नये यासाठी शेतकरी बांधवांशी चर्चा केली. त्यातून आम्ही गुर्हाळ उभे केले आहे. 
- गजाननराव लाटे , शेतकरी सवड.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim Not a lockdown, but a golden opportunity for creativity, the emergence of a new business