Video: पप्पा बाहेर जावू नका कोरोना आलाय!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

दहा बाय दहाच्या खोलीत या दोघांचीही आवरा-आवर चिमुकला डोळ्याने पाहतोय पण जेव्हा त्याला कळते की आई आणी बाबा बाहेर जात आहेत तेव्हा त्याने केलेला आकांत पोलिसांच्या कुटूंबाची होणारी तारांबळ अधोरेखित करून गेला.

 

वाशीम: दहा बाय दहाच्या खोलीत या दोघांचीही आवरा-आवर चिमुकला डोळ्याने पाहतोय पण जेव्हा त्याला कळते की आई आणी बाबा बाहेर जात आहेत तेव्हा त्याने केलेला आकांत पोलिसांच्या कुटूंबाची होणारी तारांबळ अधोरेखित करून गेला.

वाशीम येथील पोलिस दलात प्रविण सिरसाट व त्यांची पत्नीसुध्दा शिपाई म्हणून  कर्तव्यावर आहेत. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर सिरसाट दांपत्याला सकाळी सातलाच कर्तव्यावर हजर व्हावे लागते. दररोज चिमुकले झोपेतून जागे होण्याआधीच हे दोघेही पतिपत्नी दोन टोकावर कर्तव्य बजावण्यासाठी जात असत. दोन चिमुकले आजीकडे राहत मात्र एक दिवस अडिच वर्षाचा चिमुकला अचानक जागा झाला आई तर कर्तव्यावर घराबाहेर पडली होती वडिल प्रविण सिरसाट निघण्याच्या तयारित होते.

 

कोरोनाच्या प्रकोपात घराबाहेर पडू नये हे अडिच वर्षाच्या चिमुकल्या माहित झाले. त्याने "पप्पा बाहेर जावू नका बाहेर कोरोना आलाय असे म्हणून एकच आकांत केला. मात्र, चिमुकल्याच्या आकांतापुढे  या शिपायाचे कर्तव्य मोठे ठरले. रडणाऱ्या चिमुकल्याला दाराआड लोटून प्रविण सिरसाट यांनी कर्तव्याचे ठिकाण गाठले. अडीच वर्षाच्या चिमुकल्याला कोरोनाचा प्रकोप कळून घराबाहेर न पडण्याची समज आहे. तेथे त्याचे पप्पा सुजान घराबाहेर पडू नयेत म्हणून कुटूंबाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत ही वस्तुस्थिती विचार करावयास लावणारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim police baby crying due to corona fear