कर्तव्य बजावतांना पोलिस शिपायाला गाठले मृत्यूने!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

कोरोनाला रोखण्यासाठी  पोलिस दिवसरात्र खडा पहारा देत आहेत. याचा ताण असह्य होत आहे. वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस जमादाराचा कर्तव्यावर असतांना हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना आज ता.19 ला घडली आहे. सुभाष बिठोबा बोरकर असे पोलिस जमादाराचे नाव आहे. 

 

वाशीम: कोरोनाला रोखण्यासाठी  पोलिस दिवसरात्र खडा पहारा देत आहेत. याचा ताण असह्य होत आहे. वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस जमादाराचा कर्तव्यावर असतांना हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना आज ता.19 ला घडली आहे. सुभाष बिठोबा बोरकर असे पोलिस जमादाराचे नाव आहे. 

सध्या कोरोना वायरसमुळे लाॅकडाऊन आहे. संचारबंदीचे पालन व्हावे यासाठी पोलिस प्रशासन गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. बारा ते चौदा तास ड्यूटी बजावताना साप्ताहिक रजाही घेता येत नाही. या परिस्थितीत वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले व अडोळी सर्कलचे बोट जमादार असलेले सुभाष बोरकर हे सकाळी आठ वाजताच ड्यूटीवर हजर झाले होते. त्यांनी तशी नोंदही स्टेशन डायरीत केली होती.

अडोळी बिटमधे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते जागेवरच कोसळले. त्यांना तत्काळ वाशीम येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुभाष बिठोबा बोरकर यांच्या मृत्यूने पोलिसांवरील तान असह्य होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. या घटनेने पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim police on duty death