तरुणांनी लढवली वेगळीच शक्कल, अन् सापडले पोलिसांच्या तावडीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  देशात संचारबंदी लागू केली असून,जिल्ह्याच्या सीमाही बंद केल्या आहेत.त्यामुळं कामानिमित्ताने महानगरामध्ये रोजगाराच्या शोधात गेलेले नागरिक सिमाबंदी आणि वाहतूक वर निर्बंध आल्याने अडकून पडले आहेत.  मात्र घर जवळ करण्याच्या नादात  वेगवेगळी  शक्कल शोधत  आता रुग्णवाहिका चा वापर केल्याचा  प्रकार  वाशीम मध्ये  उघड  झाला  आहे. 

 

वाशीम:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  देशात संचारबंदी लागू केली असून,जिल्ह्याच्या सीमाही बंद केल्या आहेत.त्यामुळं कामानिमित्ताने महानगरामध्ये रोजगाराच्या शोधात गेलेले नागरिक सिमाबंदी आणि वाहतूक वर निर्बंध आल्याने अडकून पडले आहेत.  मात्र घर जवळ करण्याच्या नादात  वेगवेगळी  शक्कल शोधत  आता रुग्णवाहिका चा वापर केल्याचा  प्रकार  वाशीम मध्ये  उघड  झाला  आहे. 

 

अनसिंग  पोलिसांच्या  कसून केलेल्या तपासणीतून   हा प्रकार उघड झाला असून, या  रुग्णवाहिका  मध्ये रुग्ण नाही तर प्रवासी पोलिसाच्या हातात सापडले आहेत. यामधील 10  प्रवासी  औरंगाबाद  हून माहूर ला जात असल्याची माहिती मिळाली अनसिंग पोलिसांनी त्यांना समज देत आलेल्या मार्गाने पुन्हा परत पाठविले असून,रुग्णवाहिकातुन दाहजण प्रवास करीत असल्याने हे घातक आहे.त्यामुळं असा प्रवास करणे टाळा आणि आपल्याबरोबर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केलंय...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man left the ambulance to the village