रुग्णालये अन् रुग्णांमधील ‘दुवा’

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

आम्‍हाला अवश्‍य कळवा...
कोरोनाविरोधातील लढाईत अनेक योद्धे आघाडीवर आहेत. त्‍यांची भूमिका वेगळी असली तरी ध्येय मात्र एकच आहे. अशा अापल्‍या ओळखीतील, पाहण्यातील योद्ध्यांची माहिती, छायाचित्रे, व्‍हिडिओ आमच्यापर्यंत अवश्‍य पोहचवा. आपला संपर्क क्रमांक द्यायला विसरू नका. 
आम्‍हाला इ-मेल करा.  editor@esakal.com

पुणे शहरात आढळून आलेल्या कोरोनाच्या संशयित रुग्णाचे ‘इन्स्टिट्यूशनल क्वराटांइन’ (संस्थात्मक विलगीकरण) करायचे की, त्याला ‘आयसोलेशन’ (अलगीकरण) ठेवायचे, बाधित रुग्णांना कोणत्या दवाखान्यात दाखल करायचे आणि त्यांच्या कोणत्या तपासण्या करायच्या, याबाबत दैनंदिन नियोजन करण्याचे काम पुणे महापालिकेच्या अंशदायी वैद्यकीय सेवा सेवा (सीएचएच) विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आंधळे करीत आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाग्रस्तांना त्वरीत उपचार मिळण्यासाठी संबंधित रुग्णालयांना भेटी देणे, रुग्णांची स्थिती जाणून घेणे आणि त्यांचा डेटा एकत्रित करण्याचे काम डॉ. आंधळे करीत आहेत. महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने जागा कमी पडत आहे. यामुळे नव्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेकडून आतापर्यंत ११ खासगी रुग्णालयांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. आणखीही काही रुग्णालयांसोबत करार करण्याचे काम सुरू आहे. हा करार करण्यापूर्वी संबंधित रुग्णालयातील उपलब्ध खाटांची संख्या आणि अत्यवस्थ रुग्णांवरील उपचारासाठी पुरेशी साधने यांची तपासणी करावी लागते. तसेच दाखल केलेल्या रुग्णांवर व्यवस्थित उपचार होतात की नाही, यांची तपासणी करण्याची जबाबदारीही डॉ. आंधळे पार पाडत आहेत. ते नगर जिल्ह्यातील प्रतापपूर (ता. संगमनेर) येथील आहेत. लोणी (जि. नगर) येथील प्रवरानगर मेडिकल कॉलेजमधून त्यांनी ‘एमबीबीएस’ केले आहे.

दैनंदिन कामकाज 

  • संशयित कोरोना रुग्णांचे उपचारासाठी वर्गीकरण करणे
  • रुग्णांना ‘क्वराटांइन’ किंवा ‘आयसोलेशन’मध्ये ठेवायचे हे निश्‍चित ठरविणे
  • उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या विविध तपासण्यांचे नियोजन करणे
  • रुग्णाचा डेटा जमा करून अहवाल बनविणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr sunil andhale