Coronavirus : आता या प्रसिद्ध गायिकेलाही कोरोनाची लागण!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

अशोक पंडित यांनी बॉलिवूड गायिका  कनिका कपूरने कोविड -१९   साठी पॉझिटिव्ह चाचणी घेतली आहे याची माहिती दिली. 

'बेबी डॉल में सोने दी'फेम कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आज समोर आली. याची पुष्टी चित्रपटाचे निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावरून दिली. जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच सेलिब्रेटीही यापासून बचावलेले नाहीत.  

राखी सावंतची कोरोनावर मुक्ताफळं, म्हणाली 'तुमच्या कर्मांची फळं..'

गेल्या काही महिन्यांत, कोरोना व्हायरसचा प्रसार सर्व देशभर झपाट्याने होत असताना दिसत आहे. टॉम हॅन्क्स, रीटा विल्सन, इद्रीस एल्बा आणि इंदिरा वर्मा यांच्यासह हॉलीवूडमधील अनेक तारे कोरोना पॉझिटिव्ह निघालेले असतानाच आता कोरोना बॉलिवूडमध्येही शिरला आहे. 

Image result for kanika kapoor

‘एएनआय’ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशात आज कोरोनाव्हायरसबद्दल चाचणी घेणाऱ्या लोकांपैकी एक प्रसिद्ध गायिका आहे. ही गायक कनिका कपूर असून तिने कोरोनाची चाचणी घेतल्याचे अहवालात म्हटले आहे. इतर लोकप्रिय गाण्यानंमध्ये ती बेबी डॉल आणि बीट पे बूटी या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिने स्वतः इन्स्टाग्रामवरून आपण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली आहे. 

31 मार्चपर्यंत 4 मोठी शहरं राहणार बंद-मुख्यमंत्री

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hello everyone, For the past 4 days I have had signs of flu, I got myself tested and it came positive for Covid-19. My family and I are in complete quarantine now and following medical advice on how to move forward. Contact mapping of people I have been in touch with is underway aswell. I was scanned at the airport as per normal procedure 10days ago when I came back home, the symptoms have developed only 4 days ago. At this stage I would like to urge you all to practice self isolation and get tested if you have the signs. I am feeling ok, like a normal flu and a mild fever, however we need to be sensible citizens at this time and think of all around us. We can get through this without panic only if we listen to the experts and our local, state and central government directives. Wishing everyone good health. Jai Hind ! Take care, KK

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

चित्रपट निर्माते अशोके पंडित यांनी ट्विट करून सांगितले आहे की कनिका कपूरने कोरोनाची चाचणी केली आणि ती पॉझिटीव्ह निघाली आहे. पुढे त्यांनी हे “बेजबाबदार” असल्याची टीका केली आहे. ट्वीटमध्ये माहिती मिळते की ती काही दिवसांपूर्वी लंडनहून परत आली होती आणि तिने कोरोनाची बाधा झाल्याचे निदान लपवले होते. शिवाय, असं म्हटलं जात आहे की ती एका भव्य हॉटेलमध्ये थांबली होती, तिथे तिने डिनर पार्टी देखील आयोजित केली होती. 

Video : ढिंच्याक पूजाचं 'होगा ना करोना' बघितलं का?

लंडनहून परत आल्यावर आणि जवळजवळ १०० लोकांच्या संपर्कात आल्यामुळे तारांकित हॉटेलमध्ये पार्टीत सामील झाल्यानंतर, आपली माहिती लपवून बेजबाबदारपने वागल्यामुळे तुझी लाज वाटते आहे. कोरोनाची कोविड -१९ टेस्ट केली आणि आता दुसर्‍याचे जीवनही धोक्यात घातले, असे या ट्विटमध्ये लिहिले आहे. 

या ट्विटला कनिका कपूरने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashoke pandit confirms Bollywood singer Kanika Kapoor has tested positive for covid-19 evaded quarantine