Coronavirus : कोरोनाची भीती वाटते? घाबरू नका कारण...

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

- कोरोना व्हायरसने घातले जगभरात थैमान.

पुणे : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसचा फटका 177 पेक्षा जास्त देशांना बसला आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. आत्तापर्यंत जगभरात काही लाखांहून अधिक रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यातील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रशियामधील काही संशोधकांनी कोरोनाविरोधी लस तयार केली असून, सध्या सायबेरियामधील प्रयोगशाळेमध्ये या लसीची प्राण्यांवर चाचणी घेतली जात आहे. रशियाच्या आरोग्य विभागाकडूनच ही माहिती देण्यात आली. व्हेक्टर स्टेट व्हायरोलॉजी अँड बायोटेक्नोलॉजी सेंटरमधील संशोधकांनी सहा वेगवेगळ्या तांत्रिक मार्गांचा वापर करून चाचण्या घ्यायला सुरुवात केली आहे.

तसेच यातील महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात ज्या दांपत्याला कोरोनाची लागण झाली होती. ते पहिले करोनाग्रस्त दांपत्य डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहे. १४ दिवसांनी त्यांची तपासणी निगेटिव्ह आली असून, आज पुन्हा चाचणी केली जाईल आणि ती निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देऊन १४ दिवस 'होम क्वारंटाईन' केलं जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Treatment on Coronavirus is Possible