esakal | कोरोनाला रोखण्यासाठी आता भिलवाडा पॅटर्न; काय आहे हा पॅटर्न?
sakal

बोलून बातमी शोधा

what bhilwara model for corona information marathi

भिलवाडा येथे कोरोनाचा प्रादुर्भाव मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात एकाच वेळी झाला. त्यामुळे सरकारने घरोघरी स्क्रिनिंग सुरू केले आणि १ लाख लोकांची तपासणी करण्यात आली.

कोरोनाला रोखण्यासाठी आता भिलवाडा पॅटर्न; काय आहे हा पॅटर्न?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Fight with Coronavirus : भिलवाडा पॅटर्न आता देशभरात आदर्श बनत चालला असून, आता कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात हा पॅटर्न लागू करण्याचे आता संकेत देण्यात आले आहेत. देशभरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सार्वजनिक कर्फ्यू लॉकडाऊन, कम्प्लिट लॉकडाउन, कर्फ्यू लागू झाल्यानंतरही कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यात कोरोनाचे प्रथम केंद्र बनलेले भिलवाडा आता देशभर प्रसिद्ध झाले आहे. आता कोरोनाशी लढण्यासाठी भिलवाडा मॉडेल देशभर राबविण्यात येणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भीलवाडा मॉडेल म्हणजे काय?
राजस्थानातील भिलवाडा येथे कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी अवलंबलेले धोरण देशभर आता लागू केले जाऊ शकते. भिलवाडा येथे डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वेगाने वाढली. परंतु, नंतर ही संख्या २७ पेक्षा जास्त रुग्णांपर्यंत पोहोचली नाही. लागण झालेले रुग्ण येताच भिलवाडा येथे कर्फ्यू लावून या शहराच्या सीमा सील करण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालये व हॉटेल ताब्यात घेण्यात आली. लॉकडाउन काटेकोरपणे पार पाडले गेले आणि घरोघरी स्क्रिनिंग केली गेली. लोकप्रतिनिधी, माध्यम आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनाही शहरात प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. जिल्हा प्रशासन व पोलिसांचे काही अधिकारीच शहरात गेले. 

आणखी वाचा - चीन, इटलीपेक्षा भारताचा लॉकडाऊन वेगळा कसा?

म्हणून वाचला भिलवाडा
लोकांनी सामाजिक अंतर पाळावे यावर जोर देण्यात आला. या सर्व प्रकारामुळे भिलवाडा येथे कोरोनाची नवीन प्रकरणे पुढे आली नाहीत. डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफने त्यांचे मनोबल उंचावले. त्याचा परिणामही दिसून आला आणि बरेच रुग्ण बरे झाले. भिलवाडा येथे प्रशासकीय, पोलिस आणि वैद्यकीय यांच्या त्रिस्तरीय प्रयत्नांसह तेथील लोकांनीही सामाजिक अंतर पाळण्यावर काळजी घेतली. यामुळे कोरोनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता आले. भिलवाडा येथे गेल्या २० दिवसांपासून कर्फ्यू सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहर पूर्णपणे बंद केले गेले आहे, येथे तीन हजार पोलिस कर्मचारी आणि डझनभर वरिष्ठ अधिकारी तैनात आहेत.

आणखी वाचा - लॉकडाऊनमध्ये रक्तातील साखर कंट्रोल करायचीय? हे वाचा 
  
केंद्रानं मॉडेलविषयी मागविली माहिती 
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी भिलवाडा मॉडेलविषयी सविस्तर माहिती राज्य मुख्य सचिव डीबी गुप्ता यांच्याकडे मागितली आहे. भीलवाडा येथे कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी घेतलेल्या उपायांचे कौतुक करताना गुप्ता म्हणाले की, कॅबिनेट सेक्रेटरी गौबा यांनी हे मॉडेल देशभर राबविण्याचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिका्यांनी राज्यातील वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहितकुमार सिंग यांच्याकडूनही याबाबतची माहिती घेतली आहे. राज्याचे वैद्यकीय मंत्री डॉ. रघु शर्मा म्हणाले की, भिलवाडा येथे कोरोनाचा प्रादुर्भाव मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात एकाच वेळी झाला. त्यामुळे सरकारने घरोघरी स्क्रिनिंग सुरू केले आणि १ लाख लोकांची तपासणी करण्यात आली. यासाठी १५ हजार संघांची स्थापना करण्यात आली. प्रथम लॉकडाउन व त्यानंतर कर्फ्यूचे काटेकोरपणे शहरवासियांकडूनसुद्धा पालन करण्यात आले आहे. जे लोक लागण झालेले आढळले त्यांना त्वरीत दूर केले गेले. अशा लोकांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता, ज्यामुळे ते बाहेर पडू शकले नाहीत. शर्मा म्हणाले की, यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात कोरोना संक्रमित रूग्णांच्या उपचारासाठी येथील डॉक्टरांकडून वापरल्या जाणाऱ्या औषधांची माहितीही मागविली होती. त्या औषधांमुळे बरेच रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.