गाव-शहरांमध्ये उभरत्या खेळाडूंचा शोध घेतोय

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नाशिक : पूर्वी रणजी व अन्य क्रिकेट स्पर्धांतून भारतीय संघात जागा बनवावी लागायची. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अनेक खेळाडूंना उज्ज्वल करीअर घडविण्याचा राजमार्ग खुला झालाय. आयपीएलमध्ये चमकलेले अनेक खेळाडू भारतीय संघाचा चेहरा बनले आहेत. कौशल्य आहे, परंतु व्यासपीठ मिळालेले नाही अशा गाव-शहरांमधील उभरत्या खेळाडूंचा शोध घेत असल्याची माहिती माजी रणजीपटू व आयपीएलमधील गुजरात लायन्स संघाचे व्यवस्थापक अली हमीद झैदी यांनी 'सकाळ'शी बोलतांना दिली. 

नाशिक : पूर्वी रणजी व अन्य क्रिकेट स्पर्धांतून भारतीय संघात जागा बनवावी लागायची. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अनेक खेळाडूंना उज्ज्वल करीअर घडविण्याचा राजमार्ग खुला झालाय. आयपीएलमध्ये चमकलेले अनेक खेळाडू भारतीय संघाचा चेहरा बनले आहेत. कौशल्य आहे, परंतु व्यासपीठ मिळालेले नाही अशा गाव-शहरांमधील उभरत्या खेळाडूंचा शोध घेत असल्याची माहिती माजी रणजीपटू व आयपीएलमधील गुजरात लायन्स संघाचे व्यवस्थापक अली हमीद झैदी यांनी 'सकाळ'शी बोलतांना दिली. 

नाशिकच्या मुर्तुझा ट्रंकवाला, सत्यजीत बच्छाव यांच्या कामगिरीकडे लक्ष असून भविष्यात त्यांना संधी मिळण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी नमूद केले. 
उत्तरप्रदेश विरूद्ध बडोदाचा सामना पाहण्यासाठी नाशिकला आलेल्या अली हमीद झैदी यांनी 'सकाळ'शी संवाद साधला. ते म्हणाले, "की आमचा संघ गुजरातचे प्रतिनिधीत्व करीत असला तरी चांगल्या खेळाडूंचा आम्ही देशभरात शोध घेतो आहोत.त्यासाठी जास्तीत जास्त सामने पाहत असतो. देशभर फिरत असतो.

गेल्या वर्षी शिवील कौशिक याची कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये एकच ओव्हर पाहून त्याची निवड केली होती.त्या आधारे त्याची निवड "आयपीएल'साठी करण्यात आली. त्याने चांगली कामगिरीदेखील केली. आयपीएलमध्ये कुठलेही राजकारण नाही. जो चांगली कामगिरी करेल, त्याला चांगल्या संधी उपलब्ध आहेत. एक आयपीएल खेळाडूचे करीअर घडवू शकते. गुजरात लायन्सचे मालक केशव बन्सल यांचा निवड प्रक्रियेत कुठलाही हस्तक्षेप नसतो. प्रत्येक निर्णयाला त्यांचे पाठबळ असल्याने खुल्यापणाने काम करता येते.नाशिकमध्ये रणजी सामन्यानिमित्त आलो असून, येथे मुर्तुझा ट्रंकवाला व सत्यजीत बच्छाव यांच्याविषयी माहिती मिळाली आहे. त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन, संधी देता येईल का, याचा नक्‍की विचार केला जाईल. 
आयपीएल लोकप्रिय होत असल्याने त्याशीनिगडीत कॉन्ट्रावर्सीदेखील निर्माण होताय. परंतु कुठलाही गैरप्रकार रोखण्यासाठी बीसीसीआयतर्फे कठोर उपाययोजना केल्या आहेत. 

टी-20 फॉरमॅट सर्वोत्कृष्ट 
कसोटी, एकदिवसीय सामन्यापेक्षा टी-20 फॉरमॅटला क्रीडाप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. कमी वेळात भरपुर मनोरंजन होत असल्याने हा प्रकार सर्वत्र लोकप्रिय बनलाय. आयपीएल सारखी स्पर्धा नागरीकांसाठी सहलीप्रमाणे आहे. त्यात रोज भरपुर धम्माल अनुभवण्याची संधी असते. फॉरमॅटमध्ये बदल होतोय, पुढील पंधरा-वीस वर्षात आणखी कमी षटकांचे सामने खेळले जातील. परंतु त्यात खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल, असे वाटत नाही. त्यामुळे टी-20 फॉरमॅट सर्वोत्कृष्ट असल्याचे अली हमीद झैदी यांनी सांगितले. 

जिंकण्यासाठी खेळणार 
गेल्या आयपीएलमध्ये चांगल्या कामगिरीचा प्रयत्न केला. सुरेश रैना सारखा चांगला कर्णधार, ब्रावो, फ्लिंच, मॅक्‍सवेल यांच्यासह जडेदा यांच्यासारखे चांगले खेळाडू संघात आहेत. परंतु पहिलेच वर्ष असल्याने अपेक्षित यश आले नाही. खेळाडूंमध्ये सुसंवाद प्रस्तापित झाला असून यावर्षी आम्ही जिंकण्यासाठी खेळू असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: looking for budding players - zaidi