इंग्लंडचा डाव अवघ्या 211 धावांत संपुष्टात

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

कार्डिफ - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने आज (बुधवार) इंग्लंडला अवघ्या 211 धावांत रोखण्यात यश मिळविले. या स्पर्धेत ऐन वेळी कामगिरी उंचाविलेल्या पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आजदेखील शिस्तबद्ध मारा करीत ब्रिटीश फलंदाजांची परीक्षा पाहिली.

इंग्लंडकडून कर्णधार इऑन मॉर्गन (33 धावा, 53 चेंडू), जॉनी बेअरस्टोव्ह (43 धावा, 57 चेंडू), जो रुट (46 धावा, 56 चेंडू) व बेन स्टोक्‍स (34 धावा, 64 चेंडू) या फलंदाजांनी इंग्लंडच्या डावास आकार देण्यात योगदान दिले. मात्र यांपैकी एकाही फलंदाजास खेळपट्टीवर शेवटपर्यंत उभे राहून मोठी खेळी करण्यात यश आले नाही.

पाकिस्तानकडून जुनैद खान (42 धावा - 2 बळी) व रुम्मान रईस (44 धावा - 2 बळी) या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडच्या डावास धक्के दिले. याशिवाय हसन अली याने अवघ्या 35 धावांत टिपलेले 3 बळी हे पाकिस्तानी गोलंदाजीचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.

इंग्लंड व पाकिस्तानमधील हा सामना चॅंपियन्स करंडकाच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना आहे. स्पर्धेच्या उपाम्त्य फेरीचा दुसरा सामना भारत व बांगलादेश यांच्यामध्ये होणार आहे.

Web Title: Champions Trophy: England all down for 211