HBD Harbhajan Singh: कमाल गोलंदाजी अन् क्रिकेटच्या क्षेत्रात निराळा इतिहास

१९८० मध्ये जालंधरमध्ये जन्मलेल्या हरभजनने क्रिकेट जगजात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली की ऑस्ट्रेलियाला देखील त्याच्यापुढे झुकावं लागलं होतं.
Cricketer Harbhajan Singh Birthday today
Cricketer Harbhajan Singh Birthday todayesakal

क्रिकेटच्या जगतात टर्बनेटरच्या नावाने ओळख असणारा भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग याचा आज वाढदिवस.१९८० मध्ये जालंधरमध्ये जन्मलेल्या हरभजनने क्रिकेट जगजात स्वतची अशी वेगळी ओळख निर्माण केली की ऑस्ट्रेलियाला देखील त्याच्यापुढे झुकावं लागलं होतं.हरभजन पहिल्यांदा भारताकडून ऑस्ट्रेलिया विरोधात खेळला होता.मात्र यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेटने भारताला मात दिली होती.हा हरभजनचा पहिलाच सामना होता.त्यानंतर हरभजनने क्रिकेट क्षेत्रात अनेक रेकॉर्ड त्याच्या नावी नोंदवले.

हरभजन सिंग भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट काढणारा चौथा गोलंदाज आहे.याव्यतिरिक्त देशासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली 'हॅट्रिक' त्यानेच घेतली होती.या भारतीय स्पिनरने ही ऐतिहासिक नोंद २००१ साली ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मजबूत मानल्या जाणाऱ्या संघाच्या विरोधात केली होती.हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात झाला होता.

Cricketer Harbhajan Singh Birthday today
Harbhajan Singh : हरभजन सिंग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळल्या गेलेल्या या सामन्यात हरभजनने ३८.२ ओवर गोलंदाजी केली होती.आणि १३३ रन काढत ७ विकेट काढल्या होत्या.हरभजनच्या या जोरदार गोलंदाजीमुळे भारतीय संघ दोन विकेटने विजयी ठरला होता.हरभजने सिंगने देशासाठी एकूण ३६७ सामने खेळले आहेत.

हरभजन सिंगसाठी २००९ हे वर्ष विशेष ठरलं. कारण याच वर्षी हरभजन यांना क्रिकेट क्षेत्रातील महत्वाच्या कामगिरीसाठी देशातील चौथा सर्वोत्कृष्ट हद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आलं. वाढतं वय बघता मागल्या वर्षी हरभजन सिंग यांनी क्रिकेट क्षेत्रातून ब्रेक घेतलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com