कार्तिक घेईल धोनीची जागा?

योगेश कानगुडे
शनिवार, 24 मार्च 2018

दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावला आणि तो देशाचा नायक ठरला. त्याच्या या षटकाराच्या जोरावर भारताने जेतेपदाला गवसणी घातली होती. यानंतर कार्तिकला महेंद्रसिंह धोनीच्या जागी विश्वकरंड स्पर्धेमध्ये खेळवायला हवे, या चर्चेला उत आला

 दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावला आणि तो देशाचा नायक ठरला. त्याच्या या षटकाराच्या जोरावर भारताने जेतेपदाला गवसणी घातली होती. यानंतर कार्तिकला महेंद्रसिंह धोनीच्या जागी विश्वकरंड स्पर्धेमध्ये खेळवायला हवे, या चर्चेला उत आला होता. तिरंगी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीसह धोनीलाही विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे या स्पर्धेसाठी दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांची निवड करण्यात आली होती. पंतला या स्पर्धेत दोन सामन्यात खेळवण्यात आले, पण त्याला या संधीचे सोने करता आले नाही. कार्तिकने अखेरच्या सामन्यामध्ये जी भन्नाट खेळी साकारली त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. या चाहत्यांनी आता कार्तिकची तुलना धोनीशी करायला सुरुवात केली आहे. काही जणांनी तर आगामी २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये धोनीऐवजी कार्तिकला संधी द्यावी, असेही म्हटले आहे.

कार्तिक आपल्या क्षमता आणि अनुभवाच्या जोरावर भारतीय संघात आहे. टीम इंडियाची सगळ्यात अगोदर त्याला राखीव खेळाडू म्हणून पसंती असते. एक काळ भारतीय क्रिकेटमध्ये असा होता कि सलामी फलंदाज, विकेटकिपर किंवा मध्यक्रम फलंदाज यांची रिप्लेसमेंट पाहिजे असेल तर दिनेश कार्तिक याची निवड होत असे. त्यावेळेस बीसीसीआयमध्ये एन श्रीनिवासन अध्यक्ष होते. त्यावेळेस दिनेश कार्तिक संघात का आहे यावरून प्रश्न उठत होते. आता तो संघात का नाही म्हणून. हि सगळी चर्चा आता होतेय कारण धोनीने म्हटले आहे त्याने २०१९ च्या वर्ल्डकपची तयारी सुरु केली आहे. या विषयावर निष्पक्ष चर्चा होणे गरजेचे आहे. कार्तिकने स्वतः या बद्दल सांगितले कि, ‘‘धोनीशी माझी तुलना करणे अयोग्य होईल. त्याने माझ्यापेक्षा खूप जास्त पावसाळे पाहिले आहेत. माझ्यापेक्षा तो कितीतरी महान खेळाडू आहे. तो सर्व युवा खेळाडूंसाठी आदर्श आहे. तो नेहमी संघातील नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करत असतो व प्रोत्साहनही देत असतो. त्याच्याबरोबर खेळण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच समजतो.’’

५ सप्टेंबर २००४ रोजी दिनेश कार्तिकने इंग्लंडबरोबरच्या ऐतिहासिक सामन्यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सुरुवात केली. त्याच्याकडे लंबी रेस का घोडा म्हणूनही पहिले गेले. डॉमेस्टीक क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन करून त्याने संघात स्थान मिळवलं होतं. परंतु अडचण ही  झाली कि बराच काळ दिनेश कार्तिक संघासाठी आपली उपयुक्तता सिद्ध करू शकला नाही. त्याचे टेक्निक एकदम उत्तम होते. क्रिकेट पाहणारे लोक बोलायचे कि तो एकदम क्रिकेटच्या रुलबुकप्रमाणे फलंदाजी करतो. त्यावेळेस रुलबुकपेक्षा वनडे क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपानुसार वेगाने धावा करणारा फलंदाज हवा होता. नेमका कार्तिक येथे कमी पडला. त्याच वर्षी महेंद्रसिंग धोनीने वनडे क्रिकेटची सुरुवात केली. करियर सुरु करून तीन चार महिने झाले होते तेव्हा धोनीने पाकिस्तानविरुद्ध १४८ धावांची खेळी केली आणि एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य झाला. धोनी जेव्हा जेव्हा मैदानावर उतरला त्यावेळेस त्याने धावांचा पाऊस पाडला आणि कार्तिक मागे पडला.   

कार्तिक हा धोनीपेक्षा सरस यष्टीरक्षक आहे अशी चर्चा असायची. अनेक लोक यांच्याशी सहमत होते. फरक होता तो फलंदाजीमध्ये. २००७ च्या वर्ल्डकप नंतर मोठी स्पर्धा होती ती आयपील. त्यामध्ये धोनीने चांगले प्रदर्शन केले. २००७ वर्ष संपत असताना धोनीची भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. टीममध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड सारखे वरिष्ठ खेळाडू होते. धोनीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाबरोबरची मालिका जिंकली. धोनी आणि कार्तिक यांची तुलना या मालिकेपर्यंतच झाली. धोनी यशाची एकएक पायरी चढत गेला. या यशामध्ये वर्ल्डकप, चॅम्पियन ट्रॉफी सारख्या स्पर्धेचा समावेश आहे. अशातच एका षटकाराने मिळालेल्या विजयाच्या आनंदांत धोनीमुळे कार्तिकवर अन्याय झाला हि चर्चा चुकीची आहे. 
 

Web Title: Dinesh Karthiks comparison with MahendraSingh Dhoni