esakal | आयसीसी वन-डे क्रमवारीत भारताची स्मृती अव्वल स्थानी
sakal

बोलून बातमी शोधा

आयसीसी वन-डे क्रमवारीत भारताची स्मृती अव्वल स्थानी

आयसीसी वन-डे क्रमवारीत भारताची स्मृती अव्वल स्थानी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

दुबई : भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत महिला विभागात फलंदाजीत अव्वल स्थानावर आली आहे. 
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत शतक आणि नाबाद 90 धावांच्या खेळीमुळे स्मृतीने क्रमवारीत तीन क्रमांकाची झेप घेत ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरी आणि मेग लॅनिंग यांना मागे टाकले. 

महिला क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यात स्मृतीचे कमालीचे सातत्य राहिले आहे. विशेष म्हणजे 2018च्या सुरवातीपासून आतापर्यंत 15 सामने केळताना तिने दोन शतके आणि आठ अर्धशतके झळकाविली आहेत. क्रमवारीत भारताची कर्णधार मिताली राज एक क्रमांक घसरून पाचव्या स्थानी आली आहे. 
गोलंदाजीतही भारतीय फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व राखले आहे. पूनम यादव आणि दिप्ती शर्मा यांनी या दोघींना पाच क्रमांकाची झेप घेत अनुक्रमे आठवे आणि नववे स्थान मिळविले आहे. भारताची अनुभवी मध्यमगती गोलंदाज झुलन गोस्वामी चौथ्या स्थानावर आली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत एलिसे पेरी हिने आघाडीचे स्थान कायम राखले आहे. 

मानांकन यादी ः 
फलंदाजी ः 1) स्मृती मानधना (751), 2) एलिसे पेरी (ऑस्ट्रेलिया 681), 3) मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया, 675), 4) ऍमी सॅटर्थवेट (न्यूझीलंड, 669), 5) मिताली राज (भारत 669) 
गोलंदाजी ः 1) सना मीर (पाकिस्तान 663), 2) मेगन शट (ऑस्ट्रेलिया, 660), 3) मॅरिझने कॅप्प (द. आफ्रिका 643), 4) झुलन गोस्वामी (639), 5) जेस जोनासेन (ऑस्ट्रेलिया, 636)