INDvsSA | दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर 119 धावांचे लक्ष्य

वृत्तसंस्था
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. डर्बनचा पहिला सामना जिंकून सहा सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली.

सेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा दुसरा एकदिवसीय सामना आज सेंच्युरियनच्या 'सुपर स्पोर्ट्स पार्क स्टेडियम'वर खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या टीमने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

india vs south africa 2018

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा खेळ 118 धावांमध्ये आटोपला. भारतीय फिरकीसमोर दक्षिण आफ्रिकेची दाणादाण झाली. युझवेंद्र चहल हा सेंच्युरियन मैदानात एकदिवसीय सामन्यात ५ विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. डर्बनचा पहिला सामना जिंकून सहा सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवण्याचा टीम इंडिया प्रयत्न करणार आहे. भारताला जिंकण्यासाठी 119 धावांचे आव्हान राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Cricket News South Africa Team India 119 Runs Target